ग्लोईंग स्किनसाठी फक्त 10 मिनिटांत घरच्या घरी बनवा आंब्याचा फेसपॅक, तुम्हाला मिळेल चमकदार त्वचा
आंबा हे एक असे फळ आहे जे सर्वांना खायला आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की आंबा हा तुमच्या त्वचेला चमकदार देखील बनवू शकतो. या लेखात आपण आंब्याचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात बाजारांमध्ये गोड आणि रसाळ आंबे येतात. त्यात आंबा असा एक फळ आहे जो क्वचितच कोणाला आवडतं नसेल, बाकी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबा खायला खुप आवडतो. तुम्हीही आंबाप्रेमी असाल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमचा आवडता आंबा केवळ खायलाच चविष्ट नाही, तर तो तुमच्या त्वचेला चमकदार करण्यासही खूप उपयुक्त आहे. कारण आंब्यामध्ये असे अनेक घटक असतात, जे त्वचेला चमकदार आणि तरुण बनवतात. आंब्याच्या हंगामात तुम्ही त्याचा फेस पॅक घरी बनवून त्वचेला लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक फायदे मिळतील. चला तर मग आजच्या लेखात आपण आंब्याचा फेसपॅक आणि त्याचे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.
त्वचेसाठी आंब्याचे फायदे
आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमची त्वचा आर्द्र राहण्यास मदत होते. तर आंब्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि ई, तसेच बीटा-कॅरोटीन देखील असतात, जे तुमच्या त्वचेचे पोषण करतात आणि निरोगी, चमकदार त्वचेसाठी प्रोत्साहन देतात.
आंब्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्वाला कारणीभूत ठरणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचा उजळ करण्यास मदत करते. तसेच त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास आणि त्वचेचा रंग एकसमान करण्यासही मदत करू शकते.
आंब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे मुरुमांमुळे होणारी त्वचेची जळजळ शांत करू शकतात आणि लालसरपणा कमी करू शकतात.
आंब्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे कोलेजनच्या निर्मितीस मदत होते, जे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि ती सैल पडण्यापासून रोखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
– घरीच आंब्याचे फेस पॅक बनवा
साहित्य
2 मोठे चमचे पिकलेल्या आंब्याचा गर
1 मोठा चमचा साधं दही
1 चमचा चिया बियाणे
आंब्याचा फेसपॅक बनवण्याची पद्धत-
एका भांड्यात पिकलेल्या आंब्याचा गर घ्या. त्यात दही आणि चिया सीड्स टाकून पेस्ट तयार होईपर्यंत चांगले फेटून घ्या. हा आंब्याचा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग अधिक नाजूक असल्याने तो लावणे टाळा. 15 ते 20 मिनिटांनंतर तो धुवून टाका. यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
आंब्यापासून तुम्ही हे काही फेसपॅक देखील बनवून चेहऱ्यावर लावू शकता.
आंबा, मध आणि ओट्सचा फेस पॅक
* 2 मोठे चमचे पिकलेल्या आंब्याचा गर
* 1 मोठा चमचा ओट्स
फेसपॅक बनवण्याची पद्धत-
ओट्सची बारीक पूड करून घ्या. या पूडमध्ये मध टाका. आंब्याच्या गरासोबत हे मिश्रण एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हलक्या गोलाकार हालचालींनी मसाज करा. 20 मिनिटे तसाच राहू द्या, त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल.
आंबा आणि मधाचा फेस पॅक
साहित्य
2 मोठे चमचे पिकलेल्या आंब्याचा गर
1 टेबलस्पून मध
ग्लोईंग स्किनसाठी फक्त 10 मिनिटांत घरच्या घरी बनवा आंब्याचा फेसपॅक, तुम्हाला मिळेल चमकदार त्वचा
एका भांड्यात आंब्याचा गर आणि मध एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, 15 मिनिटे सुकू द्या, त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)