fertility | मुल न होण्यास पुरुषही तितकेच जबाबदार, वाईट सवयी-व्यसनाधीनतेमुळे ‘स्पर्म काऊंट’ कमी; ‘या’ कारणामुंळे प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम!

वाईट सवयीमुळे शुक्राणूंची संख्या कमालीची कमी होते. तज्ज्ञांच्या मते, आधुनिक जीवनशैलीच्या युगात पुरुषांच्या ‘शुक्राणूंची संख्या’ आणि ‘प्रजनन आरोग्य’ दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या काही वाईट सवयी म्हणता येतील. जाणून घ्या, अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन आरोग्यावर वाईट परिणाम होतोय.

fertility | मुल न होण्यास पुरुषही तितकेच जबाबदार, वाईट सवयी-व्यसनाधीनतेमुळे ‘स्पर्म काऊंट’ कमी; ‘या’ कारणामुंळे प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम!
मुल न होण्यास पुरुषही तितकेच जबाबदारImage Credit source: times of india
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:47 PM

वाढत्या वयानुसार, स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता (Fertility) कमी होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जे लोक 30 ते 40 वयोगटातील आहेत आणि जे लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या मुलं होण्याच्या क्षमतेवर खूप गंभीरपणे परिणाम (Serious consequences) होतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, माणूस 40 वर्षांचा झाला की त्याची ‘प्रजनन क्षमता’ कमी होऊ लागते. जर स्त्री गर्भधारणा करू शकत नसेल, तर त्यापैकी सुमारे 50 टक्के प्रकरणांमध्ये, गर्भधारणेतील समस्या पुरुषांच्या आरोग्याशी जोडल्या जाऊ शकतात. ‘नोव्हा साऊथ एंड आयव्हीएफ आणि फर्टिलिटी’, गुडगांव येथील फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. गुंजन सभरवाल यांच्या मते, गेल्या काही दशकांमध्ये पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या (The number of sperm) झपाट्याने कमी झाली आहे. दर 8 पैकी 1 जोडप्याला गर्भधारणे संबंधी समस्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये, 40 टक्के समस्या पुरुष वंध्यत्वामुळे येत असते.

5 वाईट सवयीमुळे होते हानी

आहार, लठ्ठपणा, पुरेशी झोप न लागणे, मानसिक ताण-तणाव, लॅपटॉप, मोबाईल रेडिएशन, धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज इत्यादींचाही प्रजनन दरावर विपरीत परिणाम झाला आहे. दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणि कामाच्या नियोजनातून प्रजनन दर वाढवता येऊ शकतो. गुंजन IVF वर्ल्डच्या फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. गुंजन गुप्ता आणि डॉ. गरिमा सिंग यांनी दैनंदिन जीवनातील 5 वाईट सवयी बाबत माहिती दिली आहे. याच चुकीच्या सवयी पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला हानी पोहोचवतात.

धुम्रपान आणि मद्यपान :– तंबाखू आणि धूम्रपान केल्याने वीर्याची गुणवत्ता कमी होते आणि शुक्राणूंच्या डीएनएला देखील नुकसान होते. या व्यतिरिक्त, मद्यपान केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी खालावते. ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते, आणि शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होऊन संख्या कमी होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

लठ्ठपणा:- सामान्य बीएमआय श्रेणीतील पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ पुरुषांमध्ये वीर्याचा दर्जा कमी असतो. वास्तविक, लठ्ठ लोकांच्या शुक्राणूंचा डीएनए अधिक खराब होतो, ज्याचा प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

तणाव:- तणावामुळे टेस्टोस्टेरॉनचे संतुलन बिघडते आणि नंतर हार्मोनल बदलांमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा वाईट परिणाम जाणवतो.

औषधांचा वापर:- बरेच लोक बॉडी बिल्डींग(स्नायू वाढवण्यासाठी) आणि काम सुखातील वेळ वाढवण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरतात. मात्र, या मुळे अंडकोष संकुचित होऊ शकते आणि शुक्राणूंचे उत्पादन हळू हळू कमी होऊन पुर्णतः बंदही होऊ शकते. याशिवाय, कोकेन किंवा गांजाच्या वापरामुळे तुमच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता तात्पुरती कमी होऊ शकते.

बैठी जीवनशैली:- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बैठ्या जीवनशैलीमुळे शुक्राणूंची गुणवत्ता, प्रमाण आणि तग धरण्याची क्षमता कमी होते. यामुळे एकूण प्रजनन क्षमता खालावते. परिणामी वर नमूद गोष्टींपासून नेहमी सावधान राहा जेणेकरून प्रजननक्षमतेशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

(जर तुम्हाला प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणतीही समस्या जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरुन योग्य उपचार वेळेत करता येतील.)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.