Health : शरीरात गर्मी वाढली की दिसतात ही 4 लक्षणे, वेळीत व्हा सावध… जाणून घ्या
ज्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण जास्त असते त्यांना डोकेदुखीची समस्या सतवताना दिसते. कारण उष्णता आपल्या शरीराचे तापमान वाढवून रक्ताभिसरण वाढवते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते.

मुंबई : बहुतेक लोकांच्या अंगात उष्णतेचे प्रमाण जास्त असते. त्यांना हिवाळ्यात देखील गरम होते किंवा थोडे चालले तरी लगेच गरम होते. अशा लोकांना सारखा फॅन लावून बसावे लागते. पण काही लोकांना उष्णतेबाबत माहिती देखील नसते. पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खरं तर आपल्या शरीरात उष्णतेचे प्रमाण जास्त असण्याचं कारण आपली बदलती जीवनशैलीच आहे. तर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
ज्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण जास्त असते त्यांना डोकेदुखीची समस्या सतवताना दिसते. कारण उष्णता आपल्या शरीराचे तापमान वाढवून रक्ताभिसरण वाढवते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास देखील निर्माण होतो. त्यामुळे ज्या लोकांना उष्णतेचा त्रास असतो त्यांना वारंवार डोकेदुखी सतावत असते.
शरीरातील उष्णता वाढल्यानंतर बहुतेक लोकांना थकवा येतो. सोबतच काही लोकांमध्ये अस्वस्थता देखील निर्माण होतात दिसते. उष्णता वाढल्यामुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो त्यामुळे लोकांना थकवा जाणवतो. तसेच शरीरात जास्त उष्णता असल्यामुळे सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे शरीरातील उष्णतेकडे दुर्लक्ष करू नये.
ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना वारंवार तोंडावर जर येण्याची समस्या निर्माण होते. जेव्हाही आपल्या शरीरातील उष्णता वाढते तेव्हा जराची समस्या निर्माण होतात दिसते. जर म्हणजे आपल्या तोंडामध्ये एक फोड येतो जो लालसर पांढरा असतो. तो आल्यानंतर काही खाणं देखील कठीण होऊन जातं आणि तो जर दुखतो देखील. तर जराची ही समस्या बहुतेक लोकांना त्रास देताना दिसते.
