Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, नवे कोरोनाबळीही 585 वर

| Updated on: Oct 27, 2021 | 9:48 AM

गेल्या 24 तासात भारतात 13 हजार 451 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 14 हजार 21 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, नवे कोरोनाबळीही 585 वर
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 1 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 13 हजार 451 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 585 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता दीड लाखांच्या आसपास आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 13 हजार 451 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 14 हजार 21 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 42 लाख 15 हजार 653 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 97 हजार 339 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 55 हजार 653 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 62 हजार 661 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 103 कोटी 53 लाख 25 हजार 577 च्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 13,451

देशात 24 तासात डिस्चार्ज – 14,021

देशात 24 तासात मृत्यू – 585

एकूण रूग्ण – 3,42,15,653

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,62,661

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,35,97,339

एकूण मृत्यू  – 4,55,653

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 1,03,53,25,577

इतर बातम्या :

ग्राहकांची दिवाळी, गृहकर्जाचा व्याजदर साडेसहा टक्क्यांच्या खाली

Hacks For Skin Glow : सुपर हेल्दी स्किन मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!