AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, मात्र आकडा 30 हजारांच्या वरच

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 773 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 309 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 945 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, मात्र आकडा 30 हजारांच्या वरच
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 19, 2021 | 10:03 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 30 हजार 773 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 309 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 773 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 309 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 945 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 34 लाख 48 हजार 163 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 26 लाख 71 हजार 167 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 44 हजार 838 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 32 हजार 158 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 80 कोटी 43 लाख 72 हजार 331 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 30,773

देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,945

देशात 24 तासात मृत्यू – 309

एकूण रूग्ण – 3,34,48,163

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,32,158

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,26,71,167

एकूण मृत्यू  – 4,44,838

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 80,43,72,331

गेल्या 24 तासातील लसीकरण – 63,97,972

देशभरातील 30,773 नव्या कोरोनाग्रस्तांपैकी केरळ राज्यात 19,325 रुग्ण सापडले आहेत. तर 309 कोरोनाबळींपैकी केरळातील 143 जणांना प्राण गमवावे लागले.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार