Health : टक्कल पडून गेलाय, घरच्या घरी कांद्याचा अशा पद्धतीने करा वापर, उगवतील नवीन केस!

तुम्हालाही ही समस्या सतावत असले तर कांद्याचा वापर करा. कांदा हा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. कांदा फक्त जेवण बनवताना वापरला जातो पण याच कांद्याचा फायदा केसांसाठी देखील होतो.

Health : टक्कल पडून गेलाय, घरच्या घरी कांद्याचा अशा पद्धतीने करा वापर, उगवतील नवीन केस!
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 9:45 AM

मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना केसगळतीची समस्या असते. वाढतं प्रदुषण, ताण-तणाव, बदलती जीवनशैली, केमिकल्स प्रोडक्टसचा अतिवापर अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना केसाशी संबधित समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात काही लोकांचे केस गळून त्यांना टक्कल पडू लागते. तर कांद्याचा रस हा केस निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. कारण कांद्याच्या रसामध्ये जीवनसत्व, सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांना मजबूत बनवतात.

कांद्याचा रस केसगळती कमी करण्यास मदत करतो. पण हा कांद्याचा रस बनवायचा कसा याबाबत बहुतेक लोकांना माहिती नसेल. तर आता रस बनवायचा कसा याबाबत आपण जाणून घेणार आहोत. यासाठी एक कांदा घ्या आणि त्याची साल काढून टाका. त्यानंतर कांद्याचे काप करून ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट एका स्वच्छ कपड्यात घाला आणि ती चांगली पिळून घ्या. अशाप्रकारे तुमचा कांद्याचा रस तयार होईल.

तर हा तयार झालेला कांद्याचा रस कापसाच्या सहाय्याने तुमच्या केसांच्या टाळूवर लावा. त्यानंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. मग तो रस तसाच 15 मिनिटे ठेवा आणि नंतर तुमचे केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. अशाप्रकारे तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा कांद्याचा रस लावा. यामुळे तुमचे केस गळणे थांबते आणि केस मजबूत होण्यास मदत होते.

कांद्याच्या रसात अँटी-बॅक्टिरियल गुणधर्म असतात जे टाळूच्या सर्व संसर्गापासून आपली सुटका करते. तसंच त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसातील कोंडा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे केसाना कांद्याचा रस लावणं फायदेशीर ठरतं. जर तुम्ही कांद्याच्या रसाने टाळूची मालिश केली तर तुमचे केस लवकर वाढतात. कांद्याचा रस आपल्या केसांच्या कूपांना पुनरुज्जीवित करण्यास मदत करतो.

जर तुम्ही कांद्याच्या रसात 2 चमचे खोबरेल तेल मिक्स केले तर ते केसांसाठी आणखी फायदेशीर ठरते. कारण खोबरेल तेलात अँटी-फंगल गुणधर्म आढळतात जे टाळूच्या संसर्गापासून आणि कोंड्यापासून संरक्षण करतात. तसंच आपले केस निरोगी राहतात. त्यामुळे कांद्याचा रस आणि खोबरेल तेलाचे मिश्रण तुमच्या टाळूवर लावा आणि अर्ध्या तासानंतर ते धुवा. यामुळे तुमचे केस निरोगी आणि चमकदार होतील.

Non Stop LIVE Update
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.