AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!

पेनकिलर औषधे तात्पुरत्या स्वरुपात शरीराची वेदना, ताप आणि जळजळ कमी करते. ही औषधे प्रभावी आहेत आणि भरपूर प्रमाणात वापरली जातात.

Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!
किडनी सुपर हेल्दी ठेवायचीय? मग या पदार्थांचे सेवन करा
| Updated on: Feb 26, 2021 | 10:33 AM
Share

मुंबई : थोडीशी डोकेदुखी, हलका ताप, शरीरात वेदना इत्यादी घटना घडल्या नाहीत की, आपण लगेच केमिस्टला विचारतो आणि पेनकिलर औषध खातो. पेनकिलर औषधे तात्पुरत्या स्वरुपात शरीराची वेदना, ताप आणि जळजळ कमी करते. ही औषधे प्रभावी आहेत आणि भरपूर प्रमाणात वापरली जातात. परंतु, ती पूर्णपणे सुरक्षित मानली जात नाहीत. ही औषधे घेत असताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर, ही औषधे जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापरली गेली, तर हे शरीरासाठी, विशेषत: आपल्या मूत्रपिंडांसाठी हानिकारक ठरू शकते (Pain killer harmful Side effects on kidney).

जास्त वेदनाशामक औषधे खाल्ल्याने मूत्रपिंड निकामी होऊ शकते!

अमेरिकेच्या नॅशनल किडनी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, दर वर्षी अमेरिकेमध्ये बर्‍याच प्रमाणात ओटीसी औषधे आणि वेदनाशामक औषधांच्या वापरामुळे किडनी फेल्युअरची 5 टक्के प्रकरणे आढळतात. एकदा मूत्रपिंडाचा रोग झाल्यास आणि नंतरही औषधे वापरणे सुरू ठेवल्यानंतर मूत्रपिंडाचा रोग आणखीनच वाढू शकतो. जर आपल्याला आधीच मूत्रपिंडाचा कोणताही आजार नसेल आणि मूत्रपिंड पूर्णपणे निरोगी असेल आणि आपण या औषधाचा जास्त वापर केला तरीही यामुळे आपल्या मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

जर तुम्हाला मूत्रपिंड निरोगी ठेवायचं असेल, तर या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

अमेरिकेच्या क्लेव्हलँड क्लिनिकने मूत्रपिंडाला नेहमी निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी सुचवल्या आहेत :

पाणी प्या, पण जास्त प्रमाणात नाही!

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास, सर्व प्रथम त्याचा मूत्रपिंडावर परिणाम होतो. म्हणून, दररोज 5 ते 6 ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे. परंतु, जास्त पाणी प्यायल्याने तुमचे मूत्रपिंड चांगले काम करेल, असे नाही. म्हणून पाणी प्या, पण आपल्या शरीराला जेव्हढे आवश्यक तेवढेच प्या (Pain killer harmful Side effects on kidney).

निरोगी आहार घ्या

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांमुळे देखील किडनीचे आजार उद्भवतात. म्हणूनच आपण निरोगी आहार खाणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून आपला रक्तदाब नियंत्रणात राहील. तसेच, मधुमेह आणि हृदयविकार देखील होणार नाही.

व्यायाम

तुम्ही नियमितपणे शारीरिक हालचाली करत राहिल्यास, तुमचे वजनही नियंत्रणाखाली राहील आणि उच्च रक्तदाबाची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. म्हणून नियमितपणे व्यायाम करा.

धूम्रपान करण्याची सवय सोडून द्या  

धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे मूत्रपिंडातील रक्त प्रवाह कमी होतो आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्यास सुरुवात होते. जर, तुम्ही धूम्रपान करत असाल, तर आजच तुमची ही सवय बदला.

हर्बल सप्लीमेंट कमी करा

व्हिटामिन पूरक आहार किंवा हर्बल पूरक पदार्थांचे सेवन केल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. म्हणून या गोष्टी वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Pain killer harmful Side effects on kidney)

हेही वाचा :

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.