Papaya Side effects : पपई खाणे या लोकांनी टाळावे, कोणासाठी ठरु शकते हानिकारक
पपई खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल. भरपूर पोषकतत्व असल्याने ते फायदेशीर आहे पण प्रत्येकासाठी नाही. पपई खाणे काही लोकांसाठी अडचणीचे असू शकते. पपई खाणे कोणासाठी हानिकारक केव्हा ठरू शकते.
पपई हे एक स्वादिष्ट असे फळ आहे. ते पौष्टिक देखील आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक घटक असतात. या पोषक तत्वांमुळे पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अनेकांना रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खायला आवडते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि त्वचा हा चांगली राहते. कोणाला वजन कमी करायचे असेल तरी पपई फायदेशीर ठरु शकते. पपई खाणे काही लोकांसाठी हानिकारक देखील असू शकते. पपईचे काही दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे कोणत्या लोकांनी ते खाऊ नये जाणून घ्या.
गर्भवती महिला
पपईमध्ये पॅपेन नावाचे एन्झाइम असते. ज्यामुळे गर्भाशयाला आकुंचन पावण्यास सुरुवात होते. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये, यामुळे गर्भपात होण्याचा देखील धोका असतो.
स्तनपान करणारी महिला
पपई खाल्ल्याने पॅपेन एंझाइम स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधातही पोहोचू शकते. हे एन्झाइम बाळाच्या पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किडनी स्टोनचा त्रास
पपईमध्ये ऑक्सॅलिक ॲसिड असते. ज्यामुळे व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. ज्यांना आधीच किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी देखील पपई खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात.
पोटाच्या समस्या असलेले लोक
पपईचे सेवन अतिसार, बद्धकोष्ठता किंवा पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्या वाढवू शकते. त्यामुळे ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी पपई खाणे टाळले पाहिजे.
ऍलर्जी
काही लोकांना पपई खाल्ल्याने ऍलर्जी असू शकते. जसे की, तोंडात खाज येणे, पुरळ येणे, पोटदुखी किंवा श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे पपई खाल्ल्यानंतर ही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी पूर्णपणे खाणे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
औषध
काही औषधे पपईवर घेतल्याने रिअॅक्शन होऊ शकते. तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर पपई खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.