pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे फायदे मोठे, पण अशा लोकांनी करु नये सेवन

आपल्या आरोग्यासाठी अनेक फळे महत्त्वाची आहेत. ज्यापैकीच एक फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब हे फळ खाल्याने अनेक आजार आपल्यापासून लांब राहू शकतात. अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. आणखी काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या.

pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे फायदे मोठे, पण अशा लोकांनी करु नये सेवन
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 10:07 PM

आपल्या आरोग्यासाठी फळे ही महत्त्वाची मानली जातात. जी लोकं फळे खातात ती लवकर आजारी पडत नाहीत. अनेक फळांमध्ये महत्त्वाचे गुणधर्म असतात. असेच एक फळ म्हणजे डाळिंब. हे फळ खूरच चविष्ट आणि गोड आहे. जे अनेक आजारांवरही फायदेशीर आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. डाळिंब या फळात व्हिटॅमिन सी आणि बी असते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक मुबलक प्रमाणात असते. डाळिंब खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. जाणून घेऊया डांळिंबचे फायदे आणि तोटे.

डाळिंबमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसामध्ये इतर फळांच्या रसापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही डाळिंब खालले पाहिजे. कॅन्सरने त्रस्त लोकांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.

अल्झायमरपासून बचाव करायचा असेल तरी डाळिंब खाल्ले पाहिजे. याच्या बिया अल्झायमर रोगाचा विकास रोखतात आणि व्यक्तीची स्मरणशक्ती मजबूत करतात.

पचनासाठी डाळिंबाचा रस आतड्यांतील जळजळ कमी करून पचन सुधारते. पण जर डायरियाचा त्रास असेल तर त्यांनी डाळिंबाचा रस न खाण्याचा सल्ला दिला जातो.

सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवातवर डाळिंबाचा रस फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस हृदयविकारावर देखील फायदेशीर आहे.

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो. धुमेहाच्या उपचारात डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंब इंसुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

डाळिंब खाण्याचे तोटे

कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डाळिंबाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे. डायरियाच्या वेळी देखील डाळिंबाचा रस पिऊ नये. जर तुम्ही तुमच्या त्वचेवर डाळिंबाचा रस लावलात तर अनेकांना खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.