Blood Sugar : मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुशखबर, ‘हे’ ड्रिंक प्यायल्याने 15 मिनिटात कमी होते शुगर लेव्हल

खराब जीवनशैली आणि वाढलेले वजन हे मधुमेहाचे मुख्य कारण असते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक बराच प्रयत्न करतात. डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरची पातळी नियंत्रणात येते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

Blood Sugar : मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुशखबर, 'हे' ड्रिंक प्यायल्याने 15 मिनिटात कमी होते शुगर लेव्हल
मधुमेह
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 5:22 PM

 मुंबई : बदलती जीवनशैली आणि वाढलेले वजन हे मधुमेहाचे मुख्य कारण असते. स्वादुपिंडातून (Pancreas) तयार होणारे इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास टाइप 2 मधुमेहचा (Diabetes) त्रास होतो. इन्सुलिमधील एक हार्मोन जो रक्तातील साखरेचे  प्रमाण नियंत्रणात ठेवतो. टाइप 2 डायबिटीसमध्ये रक्तातील साखर धोकादायक पातळीवर पोहोचते. इन्सुलिनचे कार्य बिघडल्यानंतर साखर रक्तपेशींमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. शरीर इन्सुलिनचा वापर करम्यरण्यास अपयशी ठरल्यानंतर टाइप 2 डायबिटीस होतो. अशावेळी केवळ तुमच्या योग्य आहारामुळेच रक्तातील साखरेची पातळ नियंत्रित करता येते. दरम्यान, डाळिंबाचा रस (pomegranate juice) प्यायल्याने रक्तातील साखरची पातळी नियंत्रणात येते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

  1. करंट डेव्हलपमेंट्स इन न्युट्रीशन जर्नलमध्ये छापून आलेल्या माहितीनुसार, सुमारे 236 मिली डाळिंबाचा रस पिणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखर नियंत्रणात होती. यासाठी 21 निरोगी व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यांना डाळिंबाच्या रसाचे सेवन करण्यास सांगण्यात आले होते. रिसर्चमध्ये समावेश करण्यात आलेल्या व्यक्तींना दोन गटात विभागण्यात आले. ज्यांनी डाळिंबाचा रस प्यायला त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले. लो फास्टिंग सीरम इन्सुलिन वाल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी अवघ्या 15 मिनिटांत कमी झाली.
  2. डाळिंबाच्या रसातील घटक, शरीरातील ग्लूकोज मेटाबॉलिज्म नियंत्रित करू शकतात, असा निष्कर्ष निघाला आहे. डाळिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात ॲंटी-ऑक्सीडेंट्स असतात, तसेच डाळिंबामध्ये एंथोसायनिन नावाच्या घटकामुळे त्याचा रंग गडद लाल असतो. या ॲंटी-ऑक्सीडेंट्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यात मदत होते. यावर अधिक अभ्यास सुरु आहे.
  3. न्युट्रीशन जर्नलमध्ये छापून आलेल्या माहितीनुसार डाळिबांचा रस गडद लाल रंगाचा असतो, त्यामुळे फास्टिंग सीरम ग्लूकोज कमी करण्यात आणि टाइप 2 डायबिटीजच्या इन्सुलिचे रेझिस्टंस कमी करण्यात मदत होते.
  4. https://www.youtube.com/watch?v=khHIpWMVnUk

टाइप 2 डायबिटीजची लक्षणे

– सामान्य मात्रेपेक्षा अधिक लघवी होणे.

– सतत तहान लागणे.

– खूप दमल्यासारखे वाटणे.

– अचानक वजन कमी होणे.

– गुप्तांगाच्या आसपास सारखी खाज सुटणे

– जखम झाल्यास ती भरायला वेळ लागणे

– धुरकट दिसणे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.