AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय गं… गरोदरपणात तुला स्पॉटिंगची समस्या..? अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या!

अनेकदा गर्भधारणेच्या वेळी महिलांना स्पॉटिंगचा त्रास जाणवतो. अशा वेळी बहुतेक महिला याला रक्तस्त्राव समजून खूप घाबरुन जात असतात. परंतु स्पॉटिंग आणि ब्लीडिंग यात फरक असून तो समजून घेणे आवश्‍यक आहे.

काय गं... गरोदरपणात तुला स्पॉटिंगची समस्या..? अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या!
गुड न्यूज! महिला कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्यासाठी मिळणार 'मॅटर्निटी लिव्ह'Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 09, 2022 | 6:44 PM
Share

गर्भधारणेमुळे महिलांची मासिक पाळी थांबत असते. तसेच गर्भधारणेत योनीतून रक्तस्त्राव होणे बाळासाठी जोखमीचे मानले जात असते. अशा स्थितीत एखाद्या स्त्रीला स्पॉटिंग (Spotting) झाल्यास ती घाबरून जाते. हे काही अनुचित घटनेचे लक्षण तर नाही ना? असा प्रश्‍न महिलांच्या मनात निर्माण होत असतो. पण तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात रक्ताचे हलके ठिपके दिसणे सामान्य आहे, परंतु जर रक्तस्त्राव (Bleeding) जास्त प्रमाणात होत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही देखील गर्भधारणेच्या टप्प्यातून जात असाल, तर तुम्हाला स्पॉटिंगबद्दल व गर्भधारणेत (pregnancy) घ्यावयाची काळजीबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्‍यक आहे. सुरक्षित गर्भधारणेसाठी या गोष्टी माहिती करुन घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

काय आहे स्पॉटिंग आणि ब्लीडिंगमधील फरक?

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा हलक्या गुलाबी किंवा तपकिरी रक्ताचा एखादा डाग दिसतो तसेच रक्तस्त्राव नसल्याने याला कुठल्याही प्रकारच्या पॅडची गरज पडत नाही तेव्हा त्याला स्पॉटिंग म्हटले जात असते. पण जर तुम्हाला पॅड लावण्याची गरज वाटत असेल किंवा अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर अशा परिस्थितीत, क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आवश्‍यक ठरते.

स्पॉटिंग का होते?

गर्भधारणेदरम्यान स्पॉटिंगची अनेक कारणे असू शकतात, संभाव्य कारणे पुढील प्रमाणे :

  1.  पहिल्या तिमाहीत सुमारे 20 ते 30 टक्के महिलांना स्पॉटिंग होण्याची शक्यता असते. म्हणूनच सामान्यतः ही चिंताजनक गोष्ट मानली जात नाही. परंतु पहिल्या तिमाहीनंतर स्पॉटिंग असल्यास, तज्ज्ञांना याबद्दलची माहिती दिली पाहिजे.
  2. गर्भधारणेदरम्यान, जोडीदारासोबत संबंध असतील तर तुम्हाला यामुळे स्पॉटिंग होऊ शकते. खरं तर,
  3. गर्भधारणेदरम्यान ग्रीवाच्या पॉलीप्सचा आकार वाढतो. अशा परिस्थितीत, शारीरिक संपर्कानंतर स्पॉटिंग होणे सामान्य आहे.
  4. जेव्हा फलित अंड गर्भाशयाच्या भिंतीवर आपली मुळे घट्ट करत असतो, तेव्हा स्पॉटिंगचे काही थेंब दिसतात. कोरिओन आणि प्लेसेंटामध्ये बदल झाल्यामुळे देखील स्पॉटिंग होऊ शकते.

दरम्यान, गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव ही धोक्याची घंटा मानली जाते. हे संक्रमण किंवा गर्भपाताचे लक्षण असू शकते. याशिवाय, प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर गर्भाशय ग्रीवा पसरू लागते. या प्रकरणात, रक्तस्त्राव होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या समस्यांबद्दल आपण तज्ज्ञांना सांगणे आवश्यक आहे. स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव असला तरीही, कोणत्याही परिस्थितीत स्वत: डॉक्टर बनू नका. तज्ज्ञांना याची माहिती द्या व पुढील धोका टाळा.

संबंधित बातम्या :

मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

महिलांनो… या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!

Child care : लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे उपाय करा, तोंड नेहमी राहील निरोगी!

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?