Photo: कोरोना संकटात अमेरिकेने पाठ फिरवली; रशियाने दिला भारताला मदतीचा हात!

| Updated on: Apr 25, 2021 | 9:13 AM

भारतात बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोनाचं संकट अधिकच वाढलं आहे. (Russia offers to help India battle Covid second wave)

Photo: कोरोना संकटात अमेरिकेने पाठ फिरवली; रशियाने दिला भारताला मदतीचा हात!
vladimir putin
Follow us on

नवी दिल्ली:  भारतात बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोनाचं संकट अधिकच वाढलं आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील दोन रुग्णालयातील बेड्सची संख्या कमी करण्यात आली आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा उपचार करणं कठिण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. देशातील कोरोनाचं हे संकट पाहता रशियाने भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. (Russia offers to help India battle Covid second wave)

Vladimir Putin

दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील परिस्थिती अत्यंत भयानक आहे. शवागरात मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही. स्मशानभूमीत रांगाच रांगा लागल्या आहेत. मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीही कमी पडत आहेत. केवळ कोरोनामुळे लोक मरत असल्याने हे चित्रं निर्माण झालेलं नाही. तर लोकांना उपचार मिळत नसल्याने हे चित्रं निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाच नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

oxygen-shortage

देशात शनिवारी कोरोनाचे 3,46,786 रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 1,66,10,481 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 25 लाखाच्यावर गेली आहे. देशात 24 एप्रिल रोजी 2624 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1,89,544 वर गेली आहे.

corona

दरम्यान, भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रशियाने भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतानेही रशियाकडून ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आणि टँक खरेदी करण्याचा विचार सुरू केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं. भारताने हा निर्णय घेतल्यास भारतातील ऑक्सिजनचं संकट दूर होणार आहे.

oxygen-shortage

सीरमच्या विनंतीनंतरही अमेरिकेने व्हॅक्सीनसाठीचा कच्चा माल देण्याबाबत मौन बाळगलेलं असताना रशियाने ऑक्सिजन पुरवठ्याचा भारताला प्रस्ताव दिला आहे. मात्र, अमेरिकेतील बड्या लॉबिने भारताला मदत करण्यासाठी बायडन प्रशासनावर दबाव वाढवला आहे.

Joe Biden

ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून लोक कोर्टात जात आहेत. कोर्टानेही ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारला फटकारले आहे. त्यामुळेही रशियाकडून आलेला हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

oxygen-shortage

रशियाच्या आधी चीननेही भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने चीनने हा प्रस्ताव दिला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत आणि औषधांचा पुरवठा करण्यास तयार असल्याचं चीनने म्हटलं आहे. (Russia offers to help India battle Covid second wave)

Xi-Jinping

संबंधित बातम्या:

मुंबईकरांनो कोरोना लसीकरण करायचं? तुमच्या जवळचे कोणते केंद्र आज सुरु, कोणते बंद? पाहा यादी

मोठी बातमी! फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे सुप्रीम कोर्टाचे जज एम.शांतनगौदर यांचं निधन

कोरोना रोखण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन भारताला मदत करणार; वाचा कोण काय म्हणालं?

(Russia offers to help India battle Covid second wave)