कोरोना रोखण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन भारताला मदत करणार; वाचा कोण काय म्हणालं?

भारतात कोरोना संसर्गाचं प्रचंड संकट निर्माण झाल्याने हे संकट रोखण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन भारताला मदत करणार आहे. (US working closely with India on ways to deal with Covid-19 crisis)

कोरोना रोखण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन भारताला मदत करणार; वाचा कोण काय म्हणालं?
Coronavirus- प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 8:05 AM

वॉशिंग्टन: भारतात कोरोना संसर्गाचं प्रचंड संकट निर्माण झाल्याने हे संकट रोखण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन भारताला मदत करणार आहे. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी अमेरिका भारताला मदत करण्याचे मार्ग शोधत आहे, असं व्हाइट हाऊसने म्हटलं आहे. तर कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्याने भारताला कशा प्रकारे मदत करता येईल, याचा आम्ही विचार करत असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. (US working closely with India on ways to deal with Covid-19 crisis)

व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाच्या वैश्विक संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. भारताला कशी मदत करता येईल, याबाबत राजकीय नेते आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे. आम्ही भारतीय अधिकाऱ्यांशी मिळून या संकटावर मात देण्यासाठी काम करत आहोत, असं साकी म्हणाले.

अमेरिकेचं तांत्रिक सहाय्य

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन सरकारचे आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊसी यांनीही अमेरिका भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. अमेरिकाचा रोग नियंत्रण विभाग भारताला तांत्रिक सहाय करणार आहे. त्यासाठी भारताच्या समकक्ष एजन्सींसोबत काम सुरू आहे, असं सांगितलं.

अमेरिकेचे खासदार सरसावले

दरम्यान, अमेरिकेच्या अनेक खासदारांनीही भारताला या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करण्याची बायडन प्रशासनाला विनंती केली आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी लागणारी सर्व संसाधने आमच्याकडे आहेत आणि ही आमची नैतिक जबाबदारी आहे. भारतात एकाच दिवसात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. हा आकडा जगातील सर्वात मोठा आकडा आहे, असं डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार एडवर्ड मार्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पृथ्वी दिवस हा प्रत्येकाच्या भल्यासाठीचा आहे. अमेरिकेकडे अधिक लसी आहेत, मात्र आम्ही भारतासारख्या देशांना देत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर, परराष्ट्र धोरणाच्या समितीचे अध्यक्ष, खासदार ग्रेगरी मिक्स यांनी भारतातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय वंशाच्या खासदार रो खन्ना यांनीही भारतातील परिस्थिती भयंकर असून लसीकरणातही अडचणी येत असल्याचं म्हटलं आहे.

जीव आणि रोजगार संकटात

अमेरिकेजवळ अॅस्ट्राजेनेका लसीचे 3.5 ते चार कोटी अतिरिक्त लसी आहेत. त्याचा कधीच वापर झाला नाही. आम्ही या लसी भारतात पोहचू शकतो का? त्यामुळे भारताला मदतच मिळेल, असं लोक आरोग्य विशेषज्ञ आशिष झा यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आहे. लाखो लोकांचा जीव आणि रोजगार संकटात सापडला आहे, असं अर्थशास्त्रज्ञ रमनन लक्ष्मीनारायणन यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. (US working closely with India on ways to deal with Covid-19 crisis)

संबंधित बातम्या:

अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?; शिवसेनेचा सवाल

ना रेमडेसिव्हीर ना महागडी औषधं, कमी खर्चात कोरोना रुग्ण ठणठणीत; जामखेडच्या ‘या’ डॉक्टरची महाराष्ट्रात चर्चा

विरार दुर्घटनेप्रकरणी विजय वल्लभ रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

(US working closely with India on ways to deal with Covid-19 crisis)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.