विरार दुर्घटनेप्रकरणी विजय वल्लभ रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

विरार दुर्घटनेप्रकरणी विजय वल्लभ रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
Virar Hospital Fire
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 11:35 PM

मुंबई : विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ कोव्हिड रुग्णालयात एसीच्या कंप्रेशरचा स्फोट होऊन 13 जणांचा जागीच आणि उपचारादरम्यान दोघांचा अशा एकूण 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली होती. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि स्टाफविरोधात भारती दंडिवधानाच्या कलम 304, 337, 338, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 3 जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु त्यांना सध्यातरी आरोपी ठरवण्यात आलेलं नाही. (Filed a case against the management of Vijay Vallabh Hospital in the Virar FIRE accident case)

याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन यामध्ये कुणाची काय भूमिका आहे, कुठे हलगर्जीपणा झाला, यात हॉस्पिटल प्रशासनाचा निष्काळजीपणा कुठे झाला, याबाबतचा पूर्ण तपास करून संबंधिताच्या भूमिकेप्रमाणे त्यांना आरोपी केलं जाईल, अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त परिमंडळ 02 चे पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

विरारमधील कोव्हिड रुग्णालयात आग

मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) आज (23 एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 15 जणांना प्राण गमवावे लागले. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत.

संबंधित बातम्या : 

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत कोण कोण होरपळले? वाचा संपूर्ण यादी

Virar Covid Hospital fire | विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, 14 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

(Filed a case against the management of Vijay Vallabh Hospital in the Virar FIRE accident case)

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.