Virar Hospital Fire | विरारच्या आगीत कोण कोण होरपळले? वाचा संपूर्ण यादी

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (Virar Hospital Fire dead person full list)

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत कोण कोण होरपळले? वाचा संपूर्ण यादी
Virar Hospital Fire
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 1:06 PM

Virar Hospital Fire मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तसेच आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी 2 लाख, राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख आणि महापालिकेकडून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींनाही केंद्राकडून 50 हजार तर राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. (Virar Hospital Fire dead person full list)

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

मृत रुग्णांची नावे लिंग वय
1 उमा सुरेश कनगुटकर स्त्री 63
2 निलेश भोईर पुरुष 35
3 पुखराज वल्लभदास वैष्णव पुरुष 68
4 रजनी आर कडू – स्त्री 60
5 नरेंद्र शंकर शिंदे पुरुष 58
6 कुमार किशोर दोषी पुरुष 45
7 जनार्धन मोरेश्वर म्हात्रे पुरुष 63
8 रमेश टी उपायन पुरुष 55
9 प्रवीण शिवलाल गौडा पुरुष 65
10 अमेय राजेश राऊत पुरुष 23
11 शमा अरुण म्हात्रे स्त्री 48
12 सुवर्णा एस पितळे स्त्री 64
13 सुप्रिया देशमुख स्त्री 43

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

विरार दुर्घटनाग्रस्तांना कोणाकडून किती मदत? 

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली जाणार आहे. तर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक दोन लाखांची मदत केली जाणार आहे. तर जखमी रुग्णांना प्रत्येकी 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.

विरारमधील कोव्हिड रुग्णालयात आग

मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) आज (23 एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.  (Virar Hospital Fire dead person full list)

संबंधित बातम्या :

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग, 13 जणांचा मृत्यू

Virar Hospital Fire | एसीच्या स्फोटानंतर दुसरा मजला खाक, 13 रुग्ण होरपळले, विरार रुग्णालयात आग कशी भडकली?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.