Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले

पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. (Wife dead after heard news about husband died in Virar Hospital Fire) 

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले
विजय वल्लभ रुग्णालय
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 3:01 PM

मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. (Wife dead after heard news about husband died in Virar Hospital Fire)

पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात पहाटे आग लागली. या आगीत ICU मध्ये उपचार घेत असलेल्या 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात 45 वर्षीय कुमार दोषी यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. ते वसईतील 100 फूट रोड परिसरात राहत होते. कुमार दोषी यांच्या पत्नी चांदणी दोषी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरारच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यावेळी चांदणी यांना पतीच्या निधनाची बातमी मिळताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

विरारमधील कोव्हिड रुग्णालयात आग

मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) आज (23 एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 14 जणांना प्राण गमवावे लागले. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. (Wife dead after heard news about husband died in Virar Hospital Fire)

संबंधित बातम्या : 

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत कोण कोण होरपळले? वाचा संपूर्ण यादी

Virar Covid Hospital fire | विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, 14 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.