AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 भाज्यांची सालं सोलून खाल्ल्यास आरोग्यदायी फायद्यांपासून राहाल वंचित, जाणून घ्या

तुम्ही जर या काही भाज्यांची सालं सोलून त्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही नकळत अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून वंचित राहू शकता. जाणून घ्या कोणत्या पाच भाज्या आहेत?

'या' 5 भाज्यांची सालं सोलून खाल्ल्यास आरोग्यदायी फायद्यांपासून राहाल वंचित, जाणून घ्या
Peels
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 11:10 AM
Share

रोजच्या धकाधकीच्या या जीवनात आपलं आरोग्य तंदूरस्‍त राहवं यासाठी अनेक निरोगी आहारचं सेवन करत असतो. अनेक भाज्या, फळं आपण आपल्या डाएटमध्ये समावेश करतो. पण कधी निरोगी आहाराच्या नादात असे काही करतो की आरोग्यदायी फायद्यांपासून आपण वंचित राहतो जे आपल्याला कळतच नाही. कारण बऱ्याचदा भाज्या बनवताना आपण काही भाज्यांची सालं सोलून भाजी बनवतो आणि खातो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही भाज्यांच्या सालींमध्ये आरोग्यदायी पोषक घटक लपलेले असतात? काही भाज्यांची सालंही फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहेत. म्हणूनच जर तुम्ही या काही भाज्यांची सालं सोलून खाल्ले तर तुम्ही नकळत अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून वंचित राहू शकता. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की त्या कोणत्या 5 भाज्या आहेत?

या भाज्या कधीच सोलून खाऊ नयेत?

बटाटा: बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्यांचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास मदत होते आणि जास्त वेळ पोट भरलेले राहते. म्हणून तुम्ही रोजच्या स्वंयपाकात जेवण बनवताना बटाट्याची साल काढली नाही तर ते तुमच्या शरीराला अनेक फायदे देऊ शकते.

काकडी : काकडीच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन के असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि हायड्रेशनसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. नियमित सेवनाने वजन नियंत्रित होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते. जर काकडी सेंद्रिय असेल आणि पूर्णपणे धुतली असेल तर न सोलताच सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

वांगी : वांग्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. तसेच या भाजीची साल हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. त्यांचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका देखील कमी होऊ शकतो.

गाजर : गाजरमध्ये भरपूर फायबर तसेच अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, ते शरीरातील सूज कमी करण्यासाठी तसेच दृष्टीसाठी खूप फायदेशीर मानले जाते. म्हणून गाजर स्वच्छ धुऊनच त्याचे सालं न सोलता सेवन करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.