AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : ऑपरेशन केले जाते, त्या रुमला ऑपरेशन ‘थिएटर’ का म्हणतात ? हजारो वर्षांचे रहस्य या मागे

जेथे चित्रपट पाहायला लोक जातात, त्यास थिएटर म्हटले जाते. थिएटर मनोरंजनासाठी असते. मात्र, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की रुग्णांचे ऑपरेशन केले जाते त्या जागेस ऑपरेशन थिएटर का म्हणतात ?

GK : ऑपरेशन केले जाते, त्या रुमला ऑपरेशन 'थिएटर' का म्हणतात ? हजारो वर्षांचे रहस्य या मागे
OT
| Updated on: Apr 19, 2026 | 8:57 PM
Share

आपण रुग्णालयात जातो तेव्हा जेथे रुग्णांचे ऑपरेशन केले जाते, त्या विशिष्ट खोलीच्या दारावर एक लाल रंगाचा दिवा असतो आणि ‘ऑपरेशन थिएटर’ अशी पाटी किंवा नाव लिहीलेले असते. मात्र, या रुमला थिएटर का म्हणतात ? काय आहे या मागचे रहस्य ? या मागे एक रंजक इतिहास लपलेला आहे. हा इतिहास नेमका काय आहे हे जाणून तुम्हाला उलगडा होईल की त्या थिएटर असे का म्हणतात ते…

थिएटर हा शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील ‘theatron’या शब्दापासून झाली आहे. ज्याचा अर्थ’ पाहण्याची जागा’ असा होतो. जुन्या काळात सर्जरी ही कोणतीही प्रायव्हेट प्रक्रीया नव्हती. हे एक प्रकारचे पब्लिक स्पेक्टेकल वा शैक्षणिक प्रदर्शन असायचे. १६ व्या आणि १९ व्या शतकापर्यंत ऑपरेशन थिएटर हे amphitheater अॅम्पी थिएटर सारखे बनवलेले असायचे. मध्ये उंच ऑपरेशन टेबल असायचे आणि चारी बाजूंनी पायऱ्यांची प्रेक्षा गॅलरी असायची. जेथे मेडिकल स्टुडट्न्स, डॉक्टर्स आणि कधी-कधी सर्वसामान्य प्रेक्षक असायचे, ते हे संपूर्ण ऑपरेशन पाहायचे. यामुळे याचे नाव ऑपरेशन थिएटर पडले.

जुन्या काळातील ऑपरेशन थिएटर कसे होते ?

त्या काळी anesthesia, sterilization आणि antiseptic तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. सर्जन स्ट्रीट क्लोथ्स परिधान करुन केवळ एक एप्रोन लावून आणि हातमोज्याशिवाय ऑपरेशन करायचे. ऑपरेशन वेगाने केले जायचे कारण रुग्ण वेदनेने ओरडायचे. अनेकदा ऑपरेशनची वृत्तपत्रात जाहिरात दिली जायची. पब्लिक तिकीट काढून ऑपरेशन पाहायला यायची आणि ऑपरेशन संपल्यानंतर टाळ्या वाजवायची. हा खरोखरच एक थिएट्रिकल परफॉर्मन्स सारखा वाटायचा. युरोपात सर्वात जुने कायम स्वरुपी anatomical theatre इटलीच्या University of Padua मध्ये १५९५ मध्ये बांधले होते. तेथे मृत शरीराचे डिसेक्शन सार्वजनिक स्वरुपात दाखवले जायचे. विद्यार्थ्यांनी एनाटॉमी शिकावी यासाठी असे केले जायचे. त्यानंतर लाईव्ह सर्जरी देखील याच समाविष्ठ केली. ब्रिटनमध्ये St Thomas’s Hospital सारख्या ठिकाणी देखील असे थिएटर होते.

मॉडर्न ऑपरेशन रूम कसे बदलले?

२० व्या शतकात Joseph Lister यांनी antiseptic सर्जरीचा शोध लावला. Anesthesia म्हणजे भुल देऊन शस्रक्रिया करण्याचा प्रघात वाढला. ज्यामुळे वेदने शिवाय रुग्णांची ऑपरेशन होऊ लागली. Germ theory आणि sterilization नंतर संक्रमणाचा धोका कमी होऊ लागला. आता ऑपरेशन प्रायव्हेट आणि स्टेराईल रुममध्ये होऊ लागले. प्रेक्षकांना आत येण्याची परवानगी नव्हती. केवळ गरज असलेला मेडिकल स्टाफच तेथे हजर राहू लागला. तरीही याचे नाव ऑपरेशन थिएटरच कायम राहिले. ऑपरेशन थिएटर किंवा ‘OT’ चा वापर आजही होत आहे. खास करुन भारत आणि ब्रिटन सारख्या देशात . अमेरिकेत बहुतांश ठिकाणी ‘Operating Room’ म्हणतात. आजचे ऑपरेशन थिएटरचे स्वरुप संपूर्ण बदलेले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!