Health | आपण काय खात आहोत आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम कळण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधले एक नवीन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी एक असं तंत्रज्ञान शोधले, ज्यामुळे आता तुम्ही खात असलेल्या प्रत्येक पदार्थाचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.

Health | आपण काय खात आहोत आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम कळण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधले एक नवीन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
लहान मुलांना ‘फास्ट फूड़’ नव्हे, खायला आवडतात ‘नैसर्गिक’ अन्नपदार्थ
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 3:07 PM

मुंबई : अगदी अलीकडच्या काळात म्हणायचं झालं तर लोक हवं तेवढं आणि हवं ते कुठलाही विचार न करता खातात. एखाद्या पदार्थाची (Food) चव आपल्या जिभेला आवडली की, आपण पोट भरल्यानंतरही खातो. मात्र, खाताना कधीच विचार करत नाही की, या पदार्थाचा आपल्या शरीरावर (Body) नेमका काय परिणाम होईल. परंतू काही लोक अगदी रोजच्या दिनक्रमातील अन्नपदार्थ खातानाही त्यातील कॅलरीज (Calories) तपासूनच खातात. म्हणजेच काय तर आपण किती कॅलरीज घेतोय आणि किती बॅर्न करतोय, यावर त्यांचे सर्व गणित ठरलेले असते.

अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी शोधले

थोडक्यात, आजच्या युगात स्वतःचे आरोग्य आणि खानपानाच्या सवयी याबद्दल नागरिक पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण कितीही म्हटलं तरी आपण खात असलेल्या प्रत्येक अन्नपदार्थाचा आपल्या शरीरावरचा परिणाम आजपर्यंत अचूक पद्धतीने कुणालाच सांगता आलेला नाही आणि यासाठी अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी शोधले आहे एक नवीन तंत्रज्ञान.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया

अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी एक असं तंत्रज्ञान शोधले, ज्यामुळे आता तुम्ही खात असलेल्या प्रत्येक पदार्थाचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे. अनलक्षित चयापचन (Untargeted Metabolomics) या नव्याने शोधलेल्या तंत्रज्ञानाचे नाव आहे. संशोधनाचे निष्कर्ष नेचर बायोटेक्नॉलॉजी जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत.

मेटाबोलॉमिक्समध्ये जैविक नमुना

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण खात असलेल्या अन्नपदार्थाचे पुढे काय होते हे समजून घेणे शक्य होणार आहे. ज्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्याला अधिक सोप्प होणार आहे. मेटाबोलॉमिक्समध्ये जैविक नमुन्यातील सर्व चयापचयांचे सर्वसमावेशक मापन समाविष्ट असते. मेटाबोलाइट्स हे पदार्थ असतात, सामान्यतः लहान रेणू, जेव्हा एखादा जीव अन्न, औषधे, रसायने किंवा स्वतःच्या ऊतींचे विघटन करतो तेव्हा बनवले किंवा वापरले जातात. ते चयापचय उत्पादने आहेत.

वाढलेले वजन कमी करण्यास मदत

नवीन दृष्टीकोन संदर्भ-डेटा-चालित विश्लेषणाचा वापर करून मेटाडेटा-अ‍ॅनोटेड डेटाच्या विरूद्ध टँडम मास स्पेक्ट्रोमेट्री किंवा MS/MS (एक ऐवजी दोन विश्लेषक वापरून आण्विक वजन मोजणारे एक विश्लेषणात्मक साधन) मधून मिळवलेल्या मेटाबोलॉमिक्स डेटाशी जुळण्यासाठी वापरते. म्हणजेच काय तर आपण जे काही पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतो. ते खरोखरच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का?हे कळण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. शिवाय ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्याच्यासाठी देखील हे फायदेशीर ठरेल. यासंदर्भात ANI ने सविस्तर रिपोर्ट दिलायं.