
आजकाल अनेक आहार तज्ज्ञ भात आणि चपाती संपूर्णपणे बंद करण्याचा सल्ला देत असतात. आकृती गोयल या ३४ वर्षीय महिलेने बीआयटीएस पिलानीमधील अभियांत्रिकी शिक्षणानंतर एका स्टार्टअपमध्ये लीड केले आहे. आकृती यांचा नीट परिक्षेत १,११८ क्रमांक आला होता. त्यानंतर आता त्या हिंदू राव वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करत आहेत. आरोग्य शिक्षण तज्ज्ञ असलेल्या आकृती यांनी ३१ डिसेंबर रोजी इंस्टा पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी गेली दहा वर्षे चपाती आणि भात खाणे थांबवल्यानंतर त्यांच्या शरीरात काय बदल झाला याची माहिती पोस्ट केली आहे.
इंस्टावर आकृती यांनी पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटले की माझ्या कुटुंबात डायबिटीजचा इतिहाल आहे. त्यामुळे रोटी आणि भात हा पारंपारिक आहार बंद केल्याचे त्यांनी सांगितले. भात आणि चपातीत हाय ग्लायसेमिक कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे हे पदार्थ मी टाळले असून त्याऐवजी शरीरात प्रोटीन मिळावे यासाठी मुंग डाळ चिला खाणे पसंद केल्याने उच्च एनर्जी लेव्हल आणि डायजेस्टीव्ह हेल्थ चांगली रहात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारत सध्या डायबिटीज, उच्च रक्तदाब आणि हृदय विकारासंबंधित दूर्धर आजाराची जणू लाट आल्याचे आकृती गोयल सांगतात. कारण तरुणपणात लोक त्यांच्या चुकीचा आहार घेत असतात. दहा वर्षात भात आणि चपाती न खाल्ल्याने आपण निरोगी आणि आजाराशिवाय जगत आहोत. तसेच आपली ऊर्जा २० वर्षांच्या मुली प्रमाणे असल्याचे आकृती गोयल म्हणतात.
गेल्या १० वर्षांपासून माझ्या रोजच्या जेवणात मी अजिबात चपाती किंवा भात खाल्लेला नाही. म्हणजे, अगदीच कधीतरी, ठीक आहे, मी क्वचितच खात असेन. माझ्या घरात मी पीठ किंवा तांदूळ भरत नाही. आणि गेल्या किमान दोन वर्षांपासून, मी माझ्या आहारात भाजीसोबत चपाती ऐवजी केवळ मुगाच्या डाळीचा (किंवा इतर कोणत्याही डाळीचा) साधा चिला खाते. आपण आठवड्यातून पाच वेळा वेट ट्रेनिंग करतो,” असे आकृती गोयल यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
येथे पाहा पोस्ट –
३४ वर्षीय आकृतीने पुढे सांगितले की, ‘मी बरीच सक्रिय आहे आणि माझ्या एमबीबीएस बॅचमधील इतर कोणत्याही २० वर्षांच्या मुलापेक्षा माझ्यात जास्त ऊर्जा आहे. ‘गेल्या १० वर्षांपासून मी सातत्याने व्यायाम करीत आहे, आणि मी पोळी-भात खात नाही म्हणून माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऊर्जेची कमतरता मला भासत नाही. मी पोळी-भात न खाण्याचे एक कारण म्हणजे, माझ्या संपूर्ण फॅमिलीला डायबिटीज आहे, आणि मला तो होऊ नये.’