AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवस-रात्र एसीमध्ये राहणाऱ्यांनो ही बातमी खास तुमच्यासाठी, आरोग्याच करताय नुकसान!

एसी तुम्हाला थंडपणा देत असला तरी तो तुमच्या शरीराला तितकाच घातक ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. तर आता आपण एसीमुळे आपल्या शरीराला कशाप्रकारे नुकसान पोहचू शकते याबाबत जाणून घेणार आहोत.

दिवस-रात्र एसीमध्ये राहणाऱ्यांनो ही बातमी खास तुमच्यासाठी, आरोग्याच करताय नुकसान!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 10, 2023 | 11:18 PM
Share

मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना एसीची खूप सवय असते. मग बाहेरून फिरून आल्यानंतर गरम झाल्यानंतर लोक घरात पहिला एसी लावून बसतात. किंवा बाहेर प्रवास करताना गाडीमध्ये लोक एसी चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तसेच ऑफिसमध्ये देखील एसीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बहुतेक लोकांना एसीमध्ये राहायलाच आवडते. एसीमुळे आपल्या शरीराला कशाप्रकारे नुकसान पोहचू शकते याबाबत जाणून घेणार आहोत.

डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो – जास्त वेळ एसीत बसल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. जर तुम्ही ऑफिसमध्ये एसी लावून बऱ्याच वेळ स्क्रीन समोर बसलात तर त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर दिसू लागतो. यामुळे तुमच्या डोळ्यातील ओलावा निघून जातो आणि तुमच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. एसीमध्ये जास्त वेळ बसल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे, खाज सुटणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एसी मध्ये जास्त वेळ बसणे टाळावे.

डिहायड्रेशन – एसी मध्ये जास्त वेळ बसल्यानंतर डीहायड्रेशन ची समस्या निर्माण होते. यामुळे तुम्हाला जास्त तहान लागत नाही किंवा पाणी पिण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशावेळी तुम्हाला डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे एसी मध्ये जास्त वेळ बसू नका.

सारखी झोप येणे – बहुतेक लोकांना ऑफिसमध्ये काम करताना सारखी झोप येते. याचं मुख्य कारण म्हणजे एसी आहे. तुम्ही जास्त वेळ एसीमध्ये राहिल्यानंतर तुमच्या शरीरात आळस भरतो. थंड वाऱ्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला सारखी झोप येते. यामुळे तुम्ही तुमच्या कामाकडे नीट लक्ष देखील केंद्रीत करू नाहीत.  तुम्हाला सारखी झोप येते, त्यामुळे एसी चा वापर जास्त प्रमाणात करू नका

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?