Side Effects of Eating Rice : रात्री जेवणात भात खावा की नाही? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
भाताशिवाय जेवण अपूर्ण असं म्हटलं जातं, त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात भात हा असतोच. पण या भाताचे अनेक फायदे आहेत सोबतच नुकसानही आहे. तर आज आपण भातापासून शरीराला होणारे फायदे आणि नुकसानाबाबत जाणून घ्या.

Health : भारतात भात खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. लोक भात खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत. भात हा बहुतेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. तसेच भाताशिवाय जेवण अपूर्ण असं म्हटलं जातं, त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात भात हा असतोच. पण या भाताचे अनेक फायदे आहेत सोबतच नुकसानही आहे. तर आज आपण भातापासून शरीराला होणारे फायदे आणि नुकसान याबाबत जाणून घेणार आहोत
भात खाण्याचे फायदे:-
भात खाण्यापासून शरीराला अनेक फायदे होतात. जसं की भारतात फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते पचायलाही सोपे असते. तांदूळ हे धान्य प्रतीने आणि कार्बोदकांचा एक चांगला स्त्रोत आहे त्यामुळे ते मसल्स बनवण्यासाठी खाल्ले जाऊ शकते.
भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
काही हेल्थ एक्सपर्ट दुपारच्या वेळेला भात खाण्याचा सल्ला देतात, कारण भात हे प्रोटीन आणि कार्बोधक देते ज्याची दिवसभर शरीराला गरज असते. मात्र रात्रीच्या वेळी भात खाणे आरोग्यास चांगले नाही जे काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.
डायबिटीस असलेले रूग्ण
हार्वर्ड. टी. एच. चैन तांदळाचे उच्च ग्लायसेमिक अन्न म्हणून वर्णन करतात. भात हा पदार्थ पचायला सोपा असतो पण तो शरीरातील रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तर ज्यांना आधीपासूनच डायबिटीसचा त्रास आहे अशा लोकांनी रात्रीच्या वेळी भात खाऊ नये.
हृदयरोग असलेल्यांनी खाऊ नये भात
भातामुळे मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. कारण या आजारांमध्ये हाय ब्लड शुगर सोबत हाय बीपी, हाय ट्रायग्लिसराईड आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होते. या अनेक समस्यांमुळे हृदयाचे नुकसान होऊन हृदयविकाराची समस्या निर्माण होते.
लठ्ठपणाला निमंत्रण
जर तुम्हाला फिट राहायचं असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर रात्रीच्या वेळी भात खाऊ नये. कारण भात रात्रीच्या वेळी कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज देते जे रात्री शरीरात सक्षम होत नाही. त्यामुळे शरीरातील चरबी साठून राहते त्यामुळे लोकांनी लठ्ठपणा येऊ नये म्हणून भात खाऊ नये.
कॅन्सरचा धोका
देशात ज्या ठिकाणी भात पिकवला जातो ती ठिकाणं आर्सेनिकमुळे दूषित होतात. त्यामुळे हे घटक शरीरात पोहोचल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होतो तसंच मेंदूचे कार्यही कमी होऊ शकते.
