AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silent Heart attack : कोणत्याही लक्षणांशिवायही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; कसं ओळखाल ?

सायलेंट हार्ट ॲटॅक कोणत्याही लक्षणांशिवाय येऊ शकतो. त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं की तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला असेल आणि समजलंही नसेल. अशा परिस्थितीत हृदयाची तपासणी अत्यंचत महत्वाची ठरते.

Silent Heart attack :  कोणत्याही लक्षणांशिवायही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; कसं ओळखाल ?
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 08, 2023 | 4:38 PM
Share

Silent Heart attack : गेल्या काही वर्षांमध्ये हृदयाशी संबंधित आजार (heart diseases) जीवघेणे ठरत आहे. हार्ट ॲटॅक मुळे (heart attack) होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. आता कमी वयातील लोकांनाही हार्ट ॲटॅक येतो. बऱ्याच केसेसमध्ये त्याची लक्षणं दिसतात, पण हार्ट ॲटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही येऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याला सायलेंट हार्ट ॲटॅक (silent heart attack) असे म्हटले जाते.

त्यामुळे असं होऊ शकतं की तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला असेल आणि समजलंही नाही. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार, हार्ट ॲटॅकच्या सुमारे ३० टक्के केसेस या सायलेंट हार्ट ॲटॅकच्या असतात. म्हणजेच छातीत तीव्र वेदना होत नाहीत पण ॲटॅक येतो.

चिंतेची बाब ही आहे की आता कमी वयात हृदयविकाराचा झटका येतो. जिममध्ये वर्कआऊट करताना किंवा डान्स करतानाही ॲटॅक येऊ शकतो. यापैकी अनेक केसेसमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या केसेस फक्त सायलेंट हार्ट ॲटॅकच्या असतात.पण सायलेंट हार्ट ॲटॅक का येतो आणि त्याची लक्षणे कशी ओळखता येतील, ते जाणून घेऊया.

सायलेंट हार्ट ॲटॅक म्हणजे काय ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सायलेंट हार्ट ॲटॅकच्या केसेस वाढत आहेत. हे ॲटॅकही हृदयातील आर्टरीजमधील ब्लॉकेजमुळे येतात, पण त्याची लक्षणे सहज दिसून येत नाहीत. छातीत तीव्र वेदना जाणवत नाहीत, परंतु काही केसेसमध्ये सौम्य वेदना होतात, पण काही वेळा लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. बर्‍याच केसेसमध्ये गॅसचे दुखणे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण काही वेळाने त्या व्यक्तीची तब्येत बिघडू लागते. नंतर जेव्हा त्या व्यक्तीचा ईसीजी काढला जातो किंवा हृदयाची इतर कोणतीही तपासणी केली जाते, तेव्हा समजतं की ॲटॅक आला होता. याला सायलेंट हार्ट ॲटॅक म्हणतात.

या लक्षणांकडे द्या नीट लक्ष

डॉक्टर सांगतात की सायलेंट हार्ट ॲटॅकची लक्षणेही काही केसेसमध्ये दिसतात. रुग्णाला मान, खांदा आणि जबड्यामध्ये वेदना होतात. अचानक खूप घाम येऊ लागतो. पण लोकांना असं वाटतं की ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ते हृदयाची तपासणी करत नाहीत. अशा परिस्थितीत या लक्षणांकडे नीट लक्ष दिले पाहिजे. छातीत तीव्र वेदना होणे, हेच हार्ट ॲटॅकचे लक्षण असले पाहिजे, असं काही नाही. वर नमूद केलेल्या इतर समस्यादेखील हार्ट ॲटॅकचे लक्षण आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....