AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओ चहाप्रेमी! चहासोबत चुकूनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी

दुधाच्या चहासोबत लोक ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी आणि हर्बल टी इत्यादी चहा देखील पितात. जर तुम्हालाही चहा पिण्याची आवड असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही काही पदार्थांसोबत चहा चुकूनही पिऊ नका, अन्यथा तुमची तब्येत बिघडायला वेळ लागणार नाही.

ओ चहाप्रेमी! चहासोबत चुकूनही खाऊ नयेत 'या' गोष्टी
tea loverImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 28, 2023 | 1:18 PM
Share

मुंबई: चहा हे आपल्या देशात लोकप्रिय पेय आहे. लाखो लोक आपल्या सकाळची सुरुवात चहाने करतात. आळशीपणा आला, झोप आली की लोक चहा प्यायला उशीर करत नाहीत. घरी येणाऱ्या पाहुण्यालाही चहा दिला जातो. दुधाच्या चहासोबत लोक ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी आणि हर्बल टी इत्यादी चहा देखील पितात. जर तुम्हालाही चहा पिण्याची आवड असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही काही पदार्थांसोबत चहा चुकूनही पिऊ नका, अन्यथा तुमची तब्येत बिघडायला वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे कधीही चहासोबत खाऊ नयेत.

चहासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नयेत.

थंड गोष्टी

आरोग्य तज्ञांच्या मते, गरम चहा प्यायल्यानंतर किमान अर्धा तास थंड काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. त्याचबरोबर चहामध्ये थंड गोष्टी मिसळू नयेत. असे केल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.

बेसन

चहा पिताना बेसनापासून बनवलेल्या वस्तू खाऊ नयेत. या दोघांच्या संयोगामुळे शरीराची पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि पचनसंस्था बिघडू शकते.

हळद

तज्ञांच्या मते, चहा पिताना हळदीच्या पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे गॅस-अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर चहापत्ती आणि हळद एकमेकांच्या विरोधात काम करतात. ज्यामुळे माणसांना त्रास होऊ शकतो.

लिंबू

वजन कमी करण्यासाठी अनेकांना लेमन टी पिणे आवडते. मात्र सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करू नये. आरोग्य तज्ञांच्या मते चहाची पाने लिंबामध्ये मिसळल्यास तो चहा आम्लयुक्त होऊ शकतो. यामुळे छातीत सूज, छातीत जळजळ आणि आम्ल तयार होऊ शकते.

लोहयुक्त भाज्या

लोहयुक्त भाज्या कधीही चहासोबत खाऊ नयेत. त्याचबरोबर चहासोबत तृणधान्ये, डाळ, शेंगदाणे यांसारखे लोहयुक्त पदार्थही टाळावेत. याचे कारण म्हणजे चहामध्ये ऑक्सलेट आणि टॅनिन असतात, जे लोहाशी अभिक्रिया करतात आणि आरोग्यास हानी पोहोचवतात.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!