AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nicotine Pouches ची वाढती क्रेझ, सिगारेट्सची सवय सोडवतो की नवीन सवय लावतो ?

निकोटीन पाऊच याचा धुर किंवा वास येत नाही. त्यामुळे अनेकजण यास सिगारेट्सला सुरक्षित पर्याय मानत आहेत. मात्र, यातील निकोटीनची शरीलाला सवय लागू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Nicotine Pouches ची वाढती क्रेझ, सिगारेट्सची सवय सोडवतो की नवीन सवय लावतो ?
nicotine pouches
| Updated on: Aug 04, 2026 | 7:01 PM
Share

आजकाल निकोटिन पाऊच तरुणांमध्ये प्रसिद्ध होत आहे. सिगारेट्स आणि इतर तंबाकू प्रोडक्ट्स पेक्षा वेगळे असलेले निकोटिन हे सुटसुटीत असते आणि कोणाला कळतही नाही त्यामुळे सिगारेट्सचे व्यसन असलेल्या तरुणात हा छोटासा पाऊच प्रसिद्ध बनला आहे. मात्र, हा छोटासा पाऊच सिगारेट्सला पर्याय जरी मानला जात असला तरी त्याचे देखील काही धोके आहेत. तसेच त्याचे देखील व्यसन लागू शकते का ? याचा घेतलेला हा धांडोळा…

निकोटीन पाऊच हा छोटासा पाऊच ज्याला ओठ आणि हिरड्यांच्यामध्ये तंबाकूच्या मळीसारखे ठेवले जाते. याचा धुर किंवा वास येत नाही. त्यामुळे अनेकजण यास सिगारेट्सला सुरक्षित पर्याय मानत आहेत. मात्र, यातील निकोटीनची सवय लागू शकते. तसेच हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि मेंटल हेल्थवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलिकडे निकोटिन पाऊचची वाढती विक्री आणि तरुणामधील याची वाढती क्रेझ पाहून चिंता व्यक्त केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्यामते निकोटीन पाऊचला टोबॅको -फ्री आणि क्लीन असे जाहिरातीत म्हटले जाते, त्यामुळे तरुण याकडे आकर्षित होत आहेत.

निकोटिन पाऊच कसे काम करतो ?

निकोटिन पाऊच एक छोटासा सफेद पाऊच असतो. यात सर्वसाधारणपणे तंबाकूची पाने नसतात. यात निकोटिन, फ्लेवर, स्वीटनर आणि प्लांट बेस्ड फायबरसारखा पदार्थ असतात. याला ओठ आणि हिरड्यादरम्यान ठेवले जाते. जेथे निकोटीन तोंडातील त्वचेद्वारे रक्तात पोहचते. यातून धूर निघत नाही.त्यामुळे अनेकजण याला सिगारेट्सला पर्याय म्हणून वापरतात.

हे कसे काम करते ?

निकोटीन पाऊच तोंडातील आतील स्कीनद्वारे (म्यूकोसा) थेट रक्तात जाते. हे रक्ताद्वारे थेट मेंदूत पोहचते आणि डोपामाईन ( फिल – गुड केमिकल ) ची पातळी वाढवते. त्यामुळे काही वेळासाठी तुम्हाला आनंद आणि आराम तसेच ऊर्जा मिळाल्याची जाणीव होते.

निकोटीन – निकोटीन हे नर्व्हस सिस्टीमला प्रभावित करते आणि सवयीला हे जबाबदार असते.

सेल्यूलोज – ( प्लांट फायबर ) हे पाऊचला आकार आणि साईज देते.

फ्लेवरिंग एजंट्स- स्वाद आणि सुंगध वाढवतात.

स्वीटनर- कडूपणा कमी करते.

पीएच रेगुलेटर (सोडियम कार्बोनेट/सोडियम बायकार्बोनेट) – निकोटीन तोंडाच्या आतील त्वचेला वेगाने शोषण्यास मदत करते.

ह्यूमेक्टेंट आणि स्टेबलायजर- आद्रता कायम ठेवते आणि प्रोडक्टच्या क्वालिटीला स्थिर राखण्यास मदत करतात.

तरुण का आकर्षित होत आहेत ?

जाहिरात कंपन्यांनी निकोटीन पाऊचला नेहमीच स्मोक-फ्री आणि कुल लाईफस्टाईलचा भाग म्हणत त्याची जाहिरात केली असल्याने तरुणांना त्यांचे आकर्षण वाटते. हे सहत खिशात मावते. धुराच्या शिवाय वापरता येत असल्याने तरुण याच्याकडे आकर्षित होतात. निकोटिन पाऊचच्या वापराने शॉर्ट आणि लाँग टर्म असे अनेक प्रकारचे हेल्थ रिस्क आहेत. सध्या उपलब्ध पुराव्यानुसार निकोटीन स्वत: कॅन्सर निर्माण करणारा पदार्थ ( कार्सिनोजेन ) मानला जात नाही. मात्र, शरीरातील काही पेशींच्या कार्य करण्याच्या पद्धतीला तो प्रभावित करु शकतो. निकोटिन पाऊचने कॅन्सर होतो की नाही यावर अजून संशोधन सुरु आहे.

सवय लागू शकते

निकोटिन एक ‘हाय एडिक्शन सब्सटन्स’ आहे. याच्या वारंवार वापराने शरीर आणि मेंदुला याची सवय लागू शकते. काळानंतर ही सवय निकोटीन डिपेडन्सीत बदलू शकते. ज्यांना निकोटीनची एलर्जी आहे, त्यांनी हे घेऊ नये. तसेच ज्यांचा बीपी हाय आहे त्यांनी देखील हे घेऊ नये. तसेच ज्यांना हृदय विकार आहे त्यांनीही याचे सेवन करु नये. १८ वर्षांच्या खालील मुलांनी याचे सेवन करु नये, गर्भवती महिला आणि दूध पाजणाऱ्या मातांनी याचे सेवन करु नये असे तज्ज्ञांचे मत आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना