‘या’ 5 चटपटीत मसालेदार पेयांनी उष्णतेवर होईल मात आणि शरीर राहील हायड्रेटेड

उन्हाळा म्हंटल की उष्माघाताची समस्या अनेकांना सतावत असते. यापासून संरक्षण व्हावे यासाठी अनेक थंडगार तसेच शरीराला आतून हायड्रेटेड राहील अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन आपण प्रत्येकजण करतो. अशातच तुम्ही जर या 5 चटपटीत मसालेदार पेयांचा आहारात समावेश केल्यास त्वरित उष्णतेपासून आराम मिळेल. चला तर मग आजच्या लेखात आपण या 5 पेयांबद्दल जाणून घेऊयात.

या 5 चटपटीत मसालेदार पेयांनी उष्णतेवर होईल मात आणि शरीर राहील हायड्रेटेड
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 4:26 PM

उन्हाळ्यात आपल्या आहारात हंगामी पदार्थांचा समावेश करणे आणि शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा उष्ण वारे किंवा उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात वातावरणात वाहू लागतात, तेव्हा तुम्ही तुमच आहारात अशा पेयांचा समावेश केला पाहिजे जे ऊर्जा आणि पोषक तत्वे देतात, तसेच उष्माघातापासून संरक्षणही करतात. बहुतेक पेये गोड असतात, जसे की बेलफळाचे सरबत आणि बडीशेपचे सरबत. परंतु या लेखात आपण काही मसालेदार पेयांबद्दल जाणून घेणार आहोत जी आरोग्यदायी देखील आहेत आणि शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते.

कैरीचं पन्हं

कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या सर्वात जुन्या आणि चविष्ट मसालेदार पेयांपैकी एक आहे. कच्च्या आंब्याचा गर पुदिना, काळी मिरी आणि काळे मीठ यांच्यासोबत हा पेय तयार केला जातो. थंड पाण्यासोबत प्यायल्यास त्याची चव अप्रतिम लागते. हे शरीराला हायड्रेट करते आणि उष्माघातापासून संरक्षण करते. कैरीचं पन्हं व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे.

सत्तू सरबत

बिहारचे पारंपरिक सत्तू सरबत हे प्रथिनयुक्त एक चविष्ट मसालेदार पेय आहे. थंड पाण्यात सत्तू विरघळवून त्यात हिरव्या मिरच्या, कांदे, कोथिंबीर, काळे मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड मिक्स करून हे पेय प्यायलं जाते. हे घटक मिळून एक असे मिश्रण तयार करतात, जे उष्माघातापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

कोकम सरबत

उन्हाळ्यात तुम्ही एक पारंपरिक पेय म्हणजे कोकम सरबत बनवून पिऊ शकता. कोकम सरबत बनवण्यासाठी कोकमाचा गरात काळे मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड तसेच लिंबाचा रस टाका. हलक्या गोडव्यासाठी तुम्ही थोडी साखर किंवा खडीसाखर मिक्स करू शकता. एक ग्लास थोडे थंड पाणी आणि तयार केलेले कोकम मिश्रण टाका. तुमचे आंबट-गोड कोकम सरबत तयार आहे.

मसाला ताक

मसाला ताक हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेयांपैकी एक आहे, जे प्यायल्याने शरीर ताजेतवाने करते आणि त्वरित ऊर्जा देते. जेव्हा या पोषक तत्वांनी समृद्ध ताकामध्ये काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि पुदिना मिक्स करून प्यायले जाते तेव्हा त्याचे फायदे आणखी वाढतात. तसेच ते उन्हाळ्यात तुमची पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे ते तुमच्या रोजच्या आहारात एक चांगला समावेश ठरते.

जलजीरा पेय

पुदिना, जिरे, धणे, हिरव्या मिरच्या आणि काळे मीठ वापरून बनवलेले जलजीरा हे एक असे पेय आहे जे बालपणीच्या आठवणी जागवते. उन्हाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठीही हे पेय पिणे उपयुक्त ठरते. मात्र, जलजीरा नेहमी घरीच बनवण्याची काळजी घ्या. विकतचा जलजीरा हानिकारक ठरू शकतो, कारण अनेकदा त्यात रंग किंवा अशुद्ध पाण्याचा वापर केला जातो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us