AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs RCB : कमाल झाली, सूयश शर्माचा कहर, 24 पैकी 20 डॉट बॉल, पहिल्यांदाच असं घडलं

IPL 2026, DC vs RCB: आरसीबीचा 22 वर्षीय युवा फिरकीपटू सूयश शर्मा याने सोमवारी आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर कहर केला. सूयशने दिल्ली विरुद्ध 4 ओव्हरमध्ये एका मेडनसह 20 डॉट बॉल टाकले.

DC vs RCB : कमाल झाली, सूयश शर्माचा कहर, 24 पैकी 20 डॉट बॉल, पहिल्यांदाच असं घडलं
Suyash Sharma and Krunal Pandya IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Apr 28, 2026 | 7:04 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना सोमवारी 27 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 39 व्या सामन्यात इतिहासातील चेंडूंबाबत दुसरा सर्वात मोठा विजय पाहायला मिळाला. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 76 धावांचं आव्हान 81 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबी यासह सर्वाधिक चेंडू राखून सामना जिंकणारी दुसरी टीम ठरली. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या आरसीबीच्या 2 गोलंदाजांनी दिल्लीला 75 धावांवर गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. जोशने 4 तर भुवीने 3 विकेट्स मिळवल्या. मात्र या दोघांव्यतिरिक्त आरसीबीच्या फिरकीपटूने कमाल केली. आरसीबीच्या 22 वर्षीय सूयश शर्मा याने इतिहास घडवला. सूयशने नक्की काय केलं हे जाणून घेऊयात.

टी 20 क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकता येतात. सूयश शर्मा याने 4 ओव्हर बॉलिंग केली. कमाल म्हणजे सूयशने या 4 ओव्हरमधील 24 पैकी 20 बॉल हे डॉट टाकले. सूयशने 4 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. सूयशने या 7 पैकी 3 धावा या एक्स्ट्रा (वाईड) दिल्या. तर सूयशने 1 विकेट मिळवली. सूयशने 1 मेडन ओव्हर टाकली. तसेच सूयशचा इकॉनमी रेट हा 1.75 असा होता. आयपीएल सारख्या स्पर्धेत इतका कमी इकॉनमी रेट क्वचितच पाहायला मिळतो. सुयश आधी फिरकीपटू युझवेंद्र चहल याने याच स्पर्धेत 1.5 च्या इकॉनमीने धावा देत 4 ओव्हर टाकल्या होत्या.

सूयशच्या नावावर सर्वात मोठा विक्रम

तसेच सूयश आयपीएल स्पर्धेत 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 20 डॉट बॉल टाकणारा पहिला फिरकीपटू ठरलाय. सूयशआधी वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. दीपकने 2019 साली चेन्नई सुपर किंग्स अर्थात सीएसकेचं प्रतिनिधित्व करताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 20 डॉट बॉल टाकले होते.

सूयश शर्माचं आयपीएल पदार्पण आणि कारकीर्द

सुयश शर्मा याचं हे आयपीएल कारकीर्दीतील पाचवं पर्व आहे. सूयशने 2023 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल पदार्पण केलं. सुयशने पदार्पणातील सामन्यात आपली छाप सोडली. सुयशने आरसीबी विरुद्ध 30 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. सुयशने 2 वर्ष केकेआरंच प्रतिनिधित्व केलं. सुयश 2025 पासून आरसीबीसाठी खेळतोय.

आयपीएलमध्ये एकूण किती विकेट?

सुयशने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 34 सामन्यांत 24 विकेट्स मिळवल्या आहेत. सुयशने या दरम्यान 24 विकेट्स मिळवल्या आहेत.तसेच सुयशचा या दरम्यान इकॉनमी रेट हा 8.55 असा आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है