AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाब किंग्सच्या या जर्सीवर बीसीसीआयने बंदी घालण्याचं कारण काय? प्रीति झिंटाने केला खुलासा

पंजाब किंग्स आयपीएल स्पर्धेत लाल रंगाची जर्सी परिधान करते. काळानुरूप त्या जर्सीच्या डिझाईनमध्ये बदल होत गेले. या जर्सीत चंदेरी रंगाचा वापरही केला जात होता. मात्र बीसीसीआयने या जर्सीवर आक्षेप घेतला आणि बंदी घातली. आता प्रीति झिंटाने याबाबत खुलासा केला आहे.

पंजाब किंग्सच्या या जर्सीवर बीसीसीआयने बंदी घालण्याचं कारण काय? प्रीति झिंटाने केला खुलासा
पंजाब किंग्सच्या या जर्सीवर बीसीसीआयने बंदी घालण्याचं कारण काय? प्रीति झिंटाने केला खुलासाImage Credit source: PTI
| Updated on: Apr 28, 2026 | 7:21 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सची विजयी घोडदौड सुरूच आहे. पंजाब किंग्सने मागच्या पर्वाप्रमाणे यंदाही श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला आहे. त्यामुळे 13 गुणांसह आरसीबी संघ पहिल्या स्थानावर आहे. पण पंजाब किंग्सची जर्सी काही वेगळी दिसत आहे. यापूर्वी पंजाब किंग्सच्या जर्सीत चंदेरी रंगाचा वापर केला जात होता. पण फ्रेंचायझीने हा रंग वापरणं बंद केलं आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे पंजाब किंग्सच्या चाहत्याने थेट हा प्रश्न प्रीति झिंटाला विचारला. त्यावर तिने असं का झालं त्याचं उत्तर दिलं.

एका चाहत्याने लिहिलं की, पंजाब किंग्सने जुना लाल आणि चंदेरी रंग जर्सीवर पुन्हा आणला पाहीजे. ती जर्सी खूपच छान होती. यावर प्रीति झिंटाने सांगितलं की, बीसीसीआयच्या सूचनेनंतर फ्रेंचायझीला जर्सीवरील चंदेरी रंग काढावा लागला. बीसीसीआय जर्सीवर पांढरा, ग्रे आणि चंदेरी रंग वापरू देत नाही. प्रीति झिंटा म्हणाली की, ‘चंदेरी रंग बीसीसीआयने बॅन केला आहे कारण दुसऱ्या संघांनी तक्रार केली की, पांढरा चेंडू दिसण्यास अडचण येते. जर्सीवर चंदेरी रंगामुळे पांढरा चेंडू नीट दिसत नाही.’

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सने जर्सीचा रंग बदलला आहे. इतकंच काय तर खेळण्यातही आक्रमणा दिसत आहे. पंजाब किंग्स संघाने आणखी दोन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की करेल. एकीकडे इतर संघ विजयासाठी संघर्ष करत आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्सची विजयी घोडदौड सुरू आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 7 चेंडू राखून गाठलं. यावरून पंजाब किंग्स संघाचा फॉर्म काय आहे हे दिसून येतं.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है