AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चिरकूट देशाने आधी भारताला लुटलं… नंतर महाराष्ट्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे शेतकरी हतबल, कोट्यवधींचे नुकसान

महाराष्ट्र सरकारने बांगलादेशला होणाऱ्या संत्र्यांच्या निर्यातीवरील अनुदान रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

या चिरकूट देशाने आधी भारताला लुटलं... नंतर महाराष्ट्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे शेतकरी हतबल, कोट्यवधींचे नुकसान
orange export subsidy scheme
| Updated on: Jun 19, 2026 | 6:44 PM
Share

भारताने फळे आणि भाजीपाला लागवडीत वेगाने प्रगती केली आहे. भारताच्या कृषी निर्यातीत फळबाग पिकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याचा परिणाम हा निर्यातदारांवरही झाला आहे. महाराष्ट्र सरकारने बांगलादेशला होणाऱ्या संत्र्यांच्या निर्यातीवरील अनुदान योजना अधिकृतपणे रद्द केली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संत्र्याच्या निर्यातीवरील 50 टक्के अनुदान योजना अधिकृतपणे रद्द केली. अमरावतीचे संत्रे निर्यातदार ताज खान यांनी जागरण बिझनेसला सांगितले की, सरकारने डिसेंबर 2023 मध्ये बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी शेतकऱ्यांकरिता 169 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही

अमरावतीचे संत्र्याचे निर्यातदार ताज खान यांनी जागरण बिझनेसला सांगितले की, सरकारने डिसेंबर 2023 मध्ये बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी शेतकऱ्यांकरिता 169 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. सरकारने जून 2026 नंतर हे अनुदान रद्द केले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, निर्यातदार आणि शेतकरी या निर्णयाला तोटा म्हणत आहेत.

महाराष्ट्रात संत्र्याच्या लागवडीत घट

ताज यांनी असेही स्पष्ट केले की, संत्र्याच्या निर्यातीत घट झाल्यामुळे त्यांना सर्व फळे देशांतर्गत बाजारात विकण्यास भाग पडत आहे. एक उदाहरण देताना ते म्हणाले की, पूर्वी दिल्लीला संत्र्यांचे 50 ट्रक लागत होते, आता ते 80-100 ट्रक पाठवतात. देशांतर्गत बाजारात संत्र्यांचा पुरवठा जास्त असूनही त्याला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक शेतकरी आता संत्र्याची लागवड कमी करत आहेत आणि काहींनी तर आपल्या बागा नष्टही केल्या आहेत.

याआधी भूटान आणि चीनमध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात निर्यात होत होते. तिथे मोठी बाजारपेठ होती पण आता भारतातील संत्र्यावरील आयात शुल्कात बांगलादेशने वाढ केल्याने 2023 मध्ये योजना सुरु करण्यात आली होती. शेतकरी, शेतकरी गट, सहकारी प्रक्रिया संस्था निर्यातदारांना या योजनेचा फायदा देण्यात आला होता. ही योजना सुरुवातीला फक्त 31 जानेवारी 2o24 पर्यंतच लागू होती.  पण नंतर त्याची मुदतवाढ वाढवण्यात आली आणि आता अखेरीस ती बंद करण्यात आली आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत