AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phone Pe वापर असाल तर लक्ष द्या! एक चूक महागात पडणार; नवीन नियमामुळे कट होतील पैसे

फोनपेने दीर्घकाळ न वापरलेल्या वॉलेटसाठी नवीन देखभाल शुल्क लागू केले आहे. आता दर तीन महिन्यांनी शुल्क आकारले जाईल.

Phone Pe वापर असाल तर लक्ष द्या! एक चूक महागात पडणार; नवीन नियमामुळे कट होतील पैसे
phone pe wallet
| Updated on: Jun 19, 2026 | 4:19 PM
Share

डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. लाखो लोक दैनंदिन व्यवहारांसाठी मोबाईल वॉलेट आणि UPI ॲप्स वापरतात. दरम्यान, फोनपे ने आपल्या वॉलेट युजरसाठी एक नवीन नियम जाहीर केला आहे, ज्यामुळे काही लोकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. हा नियम विशेषतः अशा युजरसाठी आहे जे फोनपे वॉलेट तयार करतात आणि बराच काळ त्याचा वापर करत नाहीत. आता या युजर्सला मोठा फटका बसणार असून त्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जे वॉलेट्स बराच काळ निष्क्रिय आहेत, त्यांच्या सेवा चालू ठेवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी आता एक निश्चित शुल्क आकारले जाईल. त्यामुळे, हा नियम कोणाला लागू होतो आणि तो कसा टाळता येईल, हे प्रत्येक वापरकर्त्याने समजून घेणे महत्त्वाचे आहे.

वॉलेट निष्क्रिय कधी मानले जाईल?

फोनपेच्या नवीन नियमात असे म्हटले आहे की, जर एखाद्या वॉलेटमधून सलग एक वर्ष कोणताही थेट आर्थिक व्यवहार केला गेला नाही, तर ते निष्क्रिय मानले जाईल. केवळ ॲप उघडणे, बॅलन्स तपासणे किंवा UPI द्वारे पेमेंट करणे ही वॉलेटची सक्रियता मानली जाणार नाही.

वॉलेट सक्रिय ठेवण्यासाठी, वापरकर्त्याला वॉलेटमधील बॅलन्स वापरणे आवश्यक आहे. याचा अर्थ, वॉलेटमधून थेट पेमेंट करणे, पैसे पाठवणे किंवा उपलब्ध बॅलन्स वापरणे आवश्यक असेल. जर संपूर्ण वर्षभर कोणतेही व्यवहार झाले नाहीत, तर वॉलेट निष्क्रिय होऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की निष्क्रिय खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त संसाधने लागतात. म्हणूनच कंपनीने अशा वॉलेट्सवर मेन्टेनेंस चार्ज  आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

फोनपेने अलीकडेच आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, जर वापरकर्त्याने सलग 365 दिवस फोनपे वॉलेटद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार केले नाहीत, तर त्यांचे वॉलेट निष्क्रिय मानले जाईल. कंपनी अशा वॉलेट्ससाठी दर तीन महिन्यांनी ₹100 (जीएसटीसह) ‘वॉलेट इनएक्टिविटी मेंटेनेंस फीस’ आकारेल.

जर वॉलेटमध्ये ₹100 किंवा त्याहून अधिक शिल्लक असेल, तर फोनपे थेट ₹100 वॉलेट वॉलेट इनएक्टिविटी मेंटेनेंस फीस वजा करेल. जर वॉलेटमध्ये ₹100 पेक्षा कमी शिल्लक असेल, तर कंपनी फक्त उपलब्ध शिल्लक वजा करेल आणि वॉलेटमधील शिल्लक शून्य होईल. मात्र, वॉलेटमध्ये नेगेटिव्ह शिल्लक तयार होणार नाही.

कोणतेही शुल्क वजा करण्यापूर्वी कंपनी युजरला सूचित करेल. तुमचे वॉलेट निष्क्रिय झाल्यास, तुम्हाला नोटिफिकेशन किंवा मेसेजद्वारे आगाऊ सूचना दिली जाईल. मेसेज मिळाल्यानंतरही वॉलेटचा वापर न केल्यास, वॉलेट बॅलन्समधून निर्धारित देखभाल शुल्क कापले जाईल. वॉलेटमध्ये बॅलन्स नसल्यास, केवळ उपलब्ध रकमेपर्यंतच रक्कम कापली जाईल. कंपनी नकारात्मक बॅलन्स तयार करणार नाही. याचा अर्थ असा की, शुल्क लागू होण्यापूर्वी वापरकर्त्यांना पुरेसा वेळ मिळेल, ज्यामध्ये ते एक छोटा व्यवहार करून आपले वॉलेट पुन्हा सक्रिय करू शकतील.

शुल्क टाळण्याचे सोपे मार्ग हे शुल्क टाळणे खूप सोपे आहे. जर तुम्ही वर्षातून किमान एकदा तुमच्या वॉलेटमधील बॅलन्स वापरला, तर वॉलेट सक्रिय राहील. यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची आवश्यकता नाही. एक छोटी रक्कम भरणे किंवा कोणालातरी पैसे पाठवणे पुरेसे असू शकते.

तज्ञांच्या मते, आपले वॉलेट नियमितपणे तपासणे ही एक चांगली सवय आहे. जर तुम्ही तुमचे वॉलेट दीर्घकाळ वापरणार नसाल, तर तुम्ही बॅलन्स काढू शकता किंवा एका छोट्या व्यवहाराने ते सक्रिय ठेवू शकता. अनेक डिजिटल फायनान्स कंपन्यांनी निष्क्रिय खात्यावर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, वापरकर्त्यांनी त्यांच्या डिजिटल वॉलेटच्या हालचालींवर लक्ष ठेवले पाहिजे. थोडी सावधगिरी बाळगल्यास अतिरिक्त शुल्क टाळता येऊ शकते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?