सिराजचा चेंडू लागला अन्… वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेआधी शुभमन गिलला दुखापत; पहिला ODI खेळणार का?
Shubman Gill Injury News: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेपूर्वी शुभमन गिल जखमी झाला आहे. तो पहिला एकदिवसीय सामना खेळू शकेल का?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) संध्याकाळी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या कोपराला मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. त्याला तात्काळ नेटमधून बाहेर नेण्यात आले आणि त्याच्या कोपराला पट्टी बांधण्यात आली. शुभमन गिल अर्ध्या तासाहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिला. यानंतर त्याने फलंदाजीचा सराव केला नाही. गिलच्या दुखापतीनंतर तो २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय खेळाडू गुरुवारपासून तिथे सराव करत आहेत. शुक्रवारच्या सराव सत्रादरम्यान, कर्णधार शुभमन गिलला सिराजच्या एका चेंडूचा फटका बसला. उजव्या कोपराला चेंडू लागल्यानंतर गिलने सराव थांबवला. तो खाली बसला आणि त्याने जखमी भागावर पट्टी बांधली. या सत्रादरम्यान रोहित शर्मादेखील त्याला भेटायला आला होता.
Rohit Sharma doing catching practice during today’s practice session at Greenfield Stadium, Thiruvananthapuram.😍💙 https://t.co/DvV2juZoLJ
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 25, 2026
दुखापतीनंतर शुभमन गिल मैदानावर परतला. खेळाडूंशी बोलला, पण नेटमध्ये फलंदाजी केली नाही. आता प्रश्न हा आहे की, दुखापत किती गंभीर आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकेल का? भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेपूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, मी चार कर्णधारांसोबत काम केले आहे आणि प्रत्येकाचा पहिला हेतू संघाला प्राधान्य देण्याचा होता. मी खूप भाग्यवान आहे की मला अशा कर्णधारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ते स्वतःपेक्षा संघाला प्राधान्य देतात.
त्यांनी शुभमन गिलचेही कौतुक केले, ज्याने कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद उत्कृष्टपणे सांभाळले, असं त्यांनी सांगितले. गिलची तंदुरुस्ती भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तो २०२६ मध्ये भारताचा सर्वात यशस्वी एकदिवसीय फलंदाज होता. त्याने यावर्षी ९ सामन्यांमधील ८ डावांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, एका शतक आणि ५ अर्धशतकांसह ९३.५० च्या सरासरीने ५६१ धावा केल्या आहेत.
