AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : ‘या’ वाईट असतील वेळीच सुधारा, नाहीतर होईल थेट किडनीवर परिणाम?

आपल्याच अशा वाईट सवयींबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या किडनीला नुकसान सहन करावे लागते. या वाईट सवय कोणत्या याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Health : 'या' वाईट असतील वेळीच सुधारा, नाहीतर होईल थेट किडनीवर परिणाम?
Image Credit source: freepik
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 10, 2023 | 11:10 PM
Share

मुंबई : सध्या धावपळीच्या जगात लोक आपल्या शरीराकडे नीट लक्ष देत नाहीत. मग शरीराकडे लक्ष न देणं, चुकीच्या सवयी अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना किडनीचा त्रास निर्माण होतो. किडनी हा शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवायचे असेल तर त्यासाठी किडनी देखील निरोगी असणे खूप गरजेचे असते.

किडनी ही आपल्या शरीरातील घाणेरडे पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. पण किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर ती निकामी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. आणि जर ती निकामी झाली तर आपल्याला अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.

1. कमी पाणी पिणे – डॉक्टर हे प्रत्येक व्यक्तीला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला नेहमी देतात. पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. तुम्ही जितके जास्त पाणी प्यायचे तितके तुमचे शरीर हायड्रेट राहते. जर तुम्हाला तुमची किडनी निरोगी ठेवायचे असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. यामुळे तुमची किडनी खराब होऊ शकते किंवा ती नीट काम करू शकत नाही.

2. लघवी रोखून धरणे- आजकाल बहुतेक लोक हे काही कामासाठी बाहेरगावी प्रवास करतात किंवा बाहेर फिरायला जाताना लोक लघवी रोखून धरतात. महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. महिलांना बाहेर कुठे जाताना  सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह मिळत नाही, त्यामुळे त्या लघवी रोखून धरतात. पण हे शरीरासाठी योग्य नाही यामुळे तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते.

3. फास्टफूड अतिप्रमाणात खाणे- आजकालच्या लोकांना बाहेरचे फास्टफूड खायला भरपूर आवडते. त्यामुळे कुठेही फिरायला जाताना किंवा कामाला जाताना लोक फास्टफूडवर ताव करताना दिसतातच. पण फास्टफूड सारखे अन्न आपल्या शरीरासाठी घातक ठरते असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर त्याचा आपल्या किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे फास्टफूड खाणं मोठ्या प्रमाणात टाळा आणि पौष्टिक अन्नाचा समावेश तुमच्या आहारात करा. यामुळे तुमची किडनी निरोगी राहण्यास मदत होईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?