Dark Elbows: काळसर कोपरांमुळे झालात त्रस्त? करून पहा हे घरगुती उपाय, लगेच होईल परिणाम

| Updated on: Sep 26, 2022 | 10:49 AM

सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांमुळे हाताची त्वचा टॅन होते. अशावेळी तुम्हाला जर हाताच्या कोपराच्या काळसरपणा घालवायचा असेल तर घरच्या घरी काही उपाय करता येतील.

Dark Elbows: काळसर कोपरांमुळे झालात त्रस्त? करून पहा हे घरगुती उपाय, लगेच होईल परिणाम
काळसर कोपरांमुळे झालात त्रस्त? करून पहा हे घरगुती उपाय, लगेच होईल परिणाम
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: आपल्यापैकी बहुतांश लोक हे नियमितपणे हाता-पायाची (hand and legs) नीट काळजी घेतात, निगा राखतात. मात्र कोपर आणि गुडघे स्वच्छ करणं (cleaning) विसरतात. सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांमुळे हाताची त्वचा टॅन (skin tanning) होते. त्यामुळे हाताचे कोपर आणि गुडघ्याची त्वचाही काळसर होते. अशावेळी तुम्हाला जर हाताच्या कोपराच्या काळसरपणा घालवायचा असेल तर घरच्या घरी (homemade remedies) काही उपाय करता येतील. हे उपाय नक्कीच लाभदायक ठरतील.

कोपरांचा काळेपणा घालवण्यासाठी नारळाचे तेल, अक्रोड आणि ॲपल व्हिनेगर उपयोगी ठरू शकतील. त्यासाठी एका भांड्यात एक चमचा नारळाचे तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा अक्रोड पावडर घालून मिश्रण नीट एकजीव करा. आता ही तयार झालेली पेस्ट कोपरांवर लाऊन थोडा वेळ तशीच ठेवावी. वाळल्यानंतर हात व कोपर स्वच्छ धुवावे.
असे केल्याने हळूहळू कोपरांचा काळेपणा दूर होईल.

काळसर कोपर स्वच्छ करायचे असेल तर एका भांड्यात दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घेऊन त्यामध्ये दोन चमचे पाणी मिसळावे. आता हे मिश्रण कापसाच्या सहाय्याने काळ्या पडलेल्या भागावर लावावे. थोड्या वेळानंतर हात स्वच्छ धुवावेत. हा उपायही फायदेशीर आहे.

हे सुद्धा वाचा

त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी दही अतिशय फायदेशीर ठरते. त्यामध्ये त्वचेचा रंग उजळवण्याचे गुणधर्म असतात. त्यासाठी एका वाटीत थोडं दही घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे मध मिसळावा. हे मिश्रण कोपरांवर आणि टॅन झालेल्या भागावर लावून थोड्या वेळाने धुवून टाकावे. याचा नियमितपणे वापर केल्यास फरक दिसून येईल.

त्वचेचे टॅनिंग दूर करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे टोमॅटोचा वापर करणे. टोमॅटोच्या रसामध्ये थोडे बेसन मिसळून त्याचे स्क्रब तयार करावे. हे स्क्रब काळ्या पडलेल्या भागावर लावून थोडे चोळावे. व नंतर धुवून टाकावे. आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय करावा. नियमित वापरानंतर थोड्या दिवसांनी फरक पडेल व तुमची काळी पडलेली त्वचा स्वच्छ होईल.