
उन्हाळा सुरू झाला या ऋतूत मिळणारे हंगामी फळे आणि भाज्या बाजारात उपलब्धता वाढते. अशातच उन्हाळा म्हंटल की आंबा, फणस, जांभुळ, अशी अनेक फळांची मागणी वाढते. तर फणस हा असा फळ आहे जो आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. फणस हा आरोग्याचा खरा खजिना आहे. त्यातील पोषक तत्वांच्या विपुलतेमुळे त्याला ‘भाज्यांचे सुपरफूड’ असेही म्हटले जाऊ शकते. विशेषतः फणसामध्ये फायबरचा एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक स्रोत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की उन्हाळ्यात फणसाचे सेवन केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे प्रदान होतात आणि कोणी याचे सर्वाधिक सेवन करावे…
आयुर्वेदात फणसाला एक जड आणि तेलकट भाजी मानली जाते, जी शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करते. तसेच कच्चा फणस योग्य प्रकारे शिजवून त्यांची भाजी बनवून सेवन केल्याने तुमच्या शरीरातील वात संतुलित करण्यासही मदत होते. अशातच ज्यांची पचनशक्ती कमजोर असेल त्या लोकांनी फणसाचे सेवन जपून करावे, कारण ते पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याच्या जड आणि तेलकट स्वरूपामुळे ते पचायला बराच वेळ लागतो.
फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि मधुमेहींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मधुमेह असलेल्या लोकांनी फणसाच्या भाजीचे सेवन केल्याने शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. फणसाच्या भाजीचे सेवन हृदयासाठीही फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यातील उच्च पोटॅशियम प्रमाणामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
फणसामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. तुम्हाला जर बद्धकोष्ठता किंवा आतड्यांमध्ये त्रास होत असेल, तर फणसाचे सेवन केल्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच शरीरातील अशुद्धी वेगाने काढून टाकते. पोटासाठी फायदेशीर असण्याव्यतिरिक्त, ही भाजी त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
फणसामध्ये असलेली ‘ए’ आणि ‘सी’ जीवनसत्त्वे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. तथापि काही लोकांनी फणसाचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यांना गॅस किंवा पचनाचा त्रास आहे, त्यांनी त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. जर तुमच्या शरीरात वात जास्त असेल, तर फणसाची भाजी बनवताना कमी मसाले वापरून तयार करा आणि मर्यादित प्रमाणात सेवन करावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)