AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या करणांकडे करू नका दुर्लक्ष!

ओवेरियन कॅन्सर असा हा एक आजार आहे जो गंभीर झाल्यास व्यक्तीचा जीव सुद्धा घेऊ शकतो. याची लक्षणे इतकेच सर्वसामान्य असतात की अनेकदा महिलांना याच्या लक्षणं बद्दल कळत सुद्धा नाही.

भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या करणांकडे करू नका दुर्लक्ष!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: social
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 17, 2022 | 11:18 PM
Share

मुंबईः ओवेरियन कॅन्सर म्हणजे (Ovarian Cancer) गर्भाशयाचा कॅन्सर. हा असा आजार आहे की जो महिलांचा गर्भशय आणि ट्युबला नष्ट करण्याची क्षमता ठेवतो. या आजारांमध्ये महिलांच्या गर्भाशयामध्ये छोट्या छोट्या आकाराच्या गाठी (Ovarian cysts) तयार होऊन जातात परंतु काळजी करण्याचे कारण असे आहे की या आजाराची लक्षणे इतकी सर्वसामान्य असतात की याबद्दल अनेक महिलांना कळत देखील नाही आणि त्यांना कोणत्या प्रकारचे संकेत सुद्धा मिळत नाही म्हणूनच अनेकदा या आजाराची लक्षणे जाणवत असली तरी अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. आपणास सांगू इच्छितो की कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे ज्यावर जर आपण वेळेवर उपचार केले नाहीत त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरातील अन्य अवयवांवर सुद्धा होऊ शकतो तसेच भविष्यात आपला मृत्यू देखील होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया गर्भाशयाचा कॅन्सर बद्दल काही लक्षणे जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रकारचे संकेत जाणवू लागल्यास या आजारावर वेळीच उपचार करून कॅन्सरला रोखता येऊ शकेल.

मासिक पाळी वेळेवर न येणे

हल्ली मासिक पाळी वेळेवर न येणे ही समस्या सर्वसाधारण झालेली आहे.बहुतेक वेळा अति लट्ठपणा ,पीसीओडी ,थायरॉईड यासारख्या समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच बदललेल्या जीवनशैलीच्या कारणामुळे सुद्धा कमी वयातच मासिक पाळी वेळेवर न येणे हे नित्यनेमाचे कारण झालेले आहे. असे नेहमी घडणे चांगले नाही .भविष्यात हे लक्षण गर्भाशयाच्या कॅन्सरचे देखील असू शकते याबद्दल अनेक महिलांना माहिती नसते. जर तुम्हाला मासिक पाळी न येण्याची समस्या खूप दिवसापासून असेल तसेच मासिक पाळी दिवसांमध्ये रक्त प्रवाह जास्त होत असेल, कंबर आणि यो’नी आसपास भागांमध्ये वेदना जाणवत असतील तर अशावेळी तज्ञ डॉक्टरांना अवश्य भेट द्यायला हवी व आवश्यक ती तपासणी सुद्धा करायला पाहिजे.

पोट फुगणे

काही महिलांना गॅसची समस्या असते यामुळे सुद्धा अनेकदा त्यांचे पोट फुगल्यासारखे वाटते. या समस्येकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात परंतु हा त्रास तुम्हाला खूप दिवसापासून असेल तर अशावेळी या त्रासाला सामान्य अजिबात समजू नका यासाठी आपल्याला तज्ञ मंडळी व डॉक्टरांचा सल्ला अवश्य द्यायला पाहिजे.आंबट ढेकर, बद्धकोष्टता ,पोट वेळेवर साफ न होणे ,अपचन, ऍसिडिटी आणि संभोग करतेवेळी वेदना होणे इत्यादी ओवेरियन कॅन्सरचे लक्षण सुद्धा असू शकतात.

लघवी संबंधित समस्या

लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी लागणे,लघवी करते वेळी मूत्राशयामध्ये वेदना होणे इत्यादी समस्या महिलांमध्ये कॉमन पाहायला मिळतात. अनेक महिलांना युरिन इन्फेक्शनची समस्या अनेकदा होत असते. जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल तर या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अशा वेळी तज्ञ डॉक्टरांशी बातचीत करून योग्य तो उपचार करा कारण की जर या त्रासाकडे आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. जर वेळेवर आपल्याला लक्षणे जाणवल्यास आपण योग्य तो उपचार करून या आजारापासून कायमस्वरूपी सुटका मिळू शकतो.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

खराब केसांवर महागड्या केराटिन ट्रीटमेंट ऐवजी घरगुती उपचारही ठरेल लाखमोलाचा!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती डाळ खायची? उत्तर इथे मिळेल!

Health : 12 ही महिने सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?.

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली….

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं