श्वेता तिवारी सारखा फिटनेस मिळवण्यासाठी महिलांनी करावे या लाडूचे सेवन, हाडे राहतील मजबूत

बॉलीवूड अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेस मुळे चाळीस वर्षांवरील महिलांसाठी एक उदाहरण आहे. या वयात हाडे कमकुवत होतात आणि ही समस्या महिलांना अधिक त्रास देते. त्यामुळे तिळापासून बनवलेले लाडू अवश्य खावे. जाणून घ्या त्याचे फायदे.

श्वेता तिवारी सारखा फिटनेस मिळवण्यासाठी महिलांनी करावे या लाडूचे सेवन, हाडे राहतील मजबूत
अभिनेत्री श्वेता तिवारीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 2:59 PM

बॉलीवूड अभिनेत्री श्वेता तिवारीचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आहे. तरीही ती अजूनही तीस वर्षांची दिसते तिचा फिटनेस आणि सौंदर्य चाहतांना वेड लावते. या वयात बहुतेक स्त्रिया कमकुवत हाडे आणि स्नायूंना बळी पडतात. गुडघ्यांमध्ये क्रॅकचा आवाज पाठीत सतत दुखणे किंवा इतर हाडाशी संबंधित समस्या स्त्रियांना अधिक त्रास देतात. महिलांचे आरोग्य कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये काळजी न घेणे कॅल्शियमची कमतरता यांचा समावेश होतो. त्यामुळे कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्त्वानी युक्त अशा गोष्टी खाणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात तिळाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते त्याचा स्वभाव उष्ण आहे त्यामुळे हिवाळ्यात तीळ खाणे उत्तम ठरते जाणून घेऊया वृद्ध महिलांसाठी तीळ कसा फायदेशीर आहे ते आणि तीळ खाण्याची योग्य पद्धत.

महिलांचे आरोग्य

भारतात किंवा जगातील बहुतांश देशांमध्ये लग्नानंतर महिलांचे वजन वाढते याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीत संपूर्ण बदल. वाढत्या वयाबरोबर हाडे आणि शरीराच्या इतर भागात वेदना सुरू होतात. मूल झाल्यानंतर शरीर पूर्णपणे बदलते. फार कमी महिला स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतात जबाबदाऱ्यांमुळे त्या नीट खाऊ शकत नाही आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहण्यास देखील असमर्थ आहे. त्यामुळे भारतातील बहुतांश विवाहित महिलांना बिघडलेल्या तब्येतीला सामोरे जावे लागते. हे सुधारण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळ्यातील सुपर फूड ठरलेले तीळ महिलांसाठी कसे वरदान ठरू शकते याबद्दल जाणून घेऊ.

तिळाचे पौष्टिक मूल्य

USDA च्या मते तिळाचे पौष्टिक मूल्य खूप जास्त आहे. 100 ग्रॅम तिळात सुमारे 573 कॅलरीज, सोडियम 11 ग्रॅम, पोटॅशियम 468 मिलीग्राम, कार्ब्स 23 ग्रॅम, आहारातील फायबर 12 ग्रॅम, प्रोटीन 18 ग्रॅम, लोह 81 टक्के, व्हिटॅमिन बी6 40 टक्के, मॅग्नेशियम 87 टक्के आणि कॅल्शियम 97 टक्के असते.

तिळाचे लाडू बनवा

हिवाळा चालू असून या ऋतू तिळाचे लाडू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. कारण त्यात तीळ व्यतिरिक्त गुळ, सुकामेवा आणि गावरान तूप टाकले जाते. प्रथम गुळ वितळून त्यात सुका मेवा टाका. त्यानंतर भाजलेले तीळ घाला आणि थोडे तूप घालून मिश्रणाला लाडूचा आकार द्या. तुमचे तिळाचे लाडू तयार आहेत. हे लाडू शरीराला उबदार ठेवण्यासोबतच इतरही अनेक फायदे देतात.

तिळाच्या लाडूचे इतर फायदे

तिळाच्या लाडू मुळे शरीराला फायबरचा पुरवठा होतो. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी तिळाचे लाडू योग्य प्रमाणात खावे.

जर एखाद्याला बीपीचा त्रास जास्त असेल तर त्याने तिळाचे सेवन करावे. कारण त्यात भरपूर पोटॅशियम असते. मात्र हा दिनक्रम सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

जे लोक बारीक आहेत किंवा वजन वाढवू इच्छित आहेत त्यांनीही तिळाच्या लाडूंचे सेवन करावे कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात आणि ते खाल्ल्याने तुम्ही बाहेरचे जंक फूड टाळू शकतात.

महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ.
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री.
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला.
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन.
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....