Health : टोमॅटोचे हे आरोग्यदायी फायदे वाचून रोज न चुकता खाल एक टोमॅटो, जाणून घ्या

टोमॅटोमुळे कॅन्सर सारख्या धोकादायक आजारापासून आपला बचाव होण्यास मदत होते. तसेच मधुमेह, त्वचेशी संबंधित समस्या यांपासून देखील सुटका मिळण्यास मदत होते. तर आता आपण टोमॅटोपासून आपल्या शरीराला काय फायदे होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : टोमॅटोचे हे आरोग्यदायी फायदे वाचून रोज न चुकता खाल एक टोमॅटो, जाणून घ्या
Tomato Healthy for body
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 8:21 PM

मुंबई : बहुतेक लोकांना टोमॅटो खायला आवडतो. त्यात जेवणामध्ये टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवणाची टोमॅटोशिवाय चव अपूर्णच. भारतीय जेवणात कांदा आणि टोमॅटो आवर्जून वापरला जातो. टोमॅटो हा जेवणाची चव वाढवतो पण तुम्हाला माहिती आहे का, टोमॅटो जेवढा चविष्ट असतो तेवढा तो आपल्या शरीरासाठी गुणकारी असतो. त्यामुळे टोमॅटोचा सुपर फुडच्या यादीमध्ये समावेश आहे.

वजन कमी होण्यास मदत – टोमॅटो खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होत नाही. तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे आपली पचन संस्था देखील मजबूत होते. त्यामुळे वजन जर कमी करायचे असेल तर टोमॅटो जरूर खा. तसेच तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोच्या सूपचा देखील समावेश करू शकता.

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत – मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टोमॅटो हा खूप फायदेशीर ठरतो. टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर असे अनेक गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. तर मधुमेह असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचा समावेश त्यांच्या आहारात करणं खूप गरजेचे आहे. तसेच ते टोमॅटोचे सूप देखील पिऊ शकतात.

स्किनसाठी फायदेशीर- टोमॅटो आपल्या स्किनसाठी देखील खूप फायदेशीर असतो. तुम्ही फक्त टोमॅटो खाऊच नाही शकत तर तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर देखील लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स कमी होण्यास मदत होते. तसेच जर तुम्हाला सनबर्न झालं असेल तर तुम्ही टोमॅटो आवर्जून खा. टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो. नैसर्गिकरित्या टोमॅटोचा वापर चेहऱ्यावरती क्लींजर म्हणून देखील केला जातो. टोमॅटोमुळे आपली आपली स्किन चमकदार होण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका कमी होतो – टोमॅटो खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. कारण टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते जे एक कैरोटीनॉयड आहे. टोमॅटो कॅन्सरविरोधात किमो प्रिव्हेंटिव्ह प्रमाणे काम करतो. त्यामुळे टोमॅटोचा तुमच्या आहारात समावेश केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.