जागतिक डेंग्यू दिन 2025 निमित्त “साथ लढूया डेंग्यूशी” मोहीम सुरू; TV9 नेटवर्क, ऑल आऊट आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची भागीदारी

जागतिक डेंग्यू दिन 2025 च्या निमित्ताने, TV9 नेटवर्कने ऑल आऊट आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने “साथ लढूया डेंग्यूशी” ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ही बहुपदरी मोहीम सहा प्रादेशिक चॅनेल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर राबवली जात असून, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, माहितीपूर्ण व्हिडिओज आणि राष्ट्रीय चर्चासत्राचा समावेश आहे.

जागतिक डेंग्यू दिन 2025 निमित्त “साथ लढूया डेंग्यूशी” मोहीम सुरू; TV9 नेटवर्क, ऑल आऊट आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची भागीदारी
Saath Ladenge Dengue Se Campaign
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 15, 2025 | 8:27 PM

नवी दिल्ली : डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये डेंग्यू आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ऑल आऊट या विश्वासार्ह ब्रँडने इंडियन मेडिकल असोसिएशन आणि TV9 नेटवर्क बरोबर भागीदारी करत “साथ लढूया डेंग्यूशी” ही राष्ट्रीय जनजागृती मोहीम सुरू केली आहे. डेंग्यू आजाराची इत्थंभूत माहिती मिळत असल्याने या मोहिमेला जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता काही दिवस चालणारी असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, फायलरीया यांसारख्या जिवघेण्या रोगांबाबत जनजागृती करत आहे. डासांना केवळ त्रासदायक कीटक समजण्याऐवजी रोगवाहक म्हणून ओळखण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

मोहीम नसून चळवळ

TV9 नेटवर्कचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित त्रिपाठी यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. TV9 नेटवर्कमध्ये आम्ही मीडियाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यावर विश्वास ठेवतो. ऑल आऊटच्या सहकार्याने आम्ही केवळ एक मोहीम दाखवत नाही, तर संपूर्ण देशभरात एक चळवळ उभी करत आहोत, असं अमित त्रिपाठी यांनी सांगितलं.

यावेळी टीव्ही9 नेटवर्कचे चीफ ग्रोथ ऑफिसर रक्तिम दास यांनीही भूमिका मांडली. ‘साथ लढूया डेंग्यूशी – ऑल आऊट पुढाकार’ ही मोहीम जनतेला वैद्यकीय माहिती आणि परिणामकारक गोष्टी सांगून सशक्त बनवते. ही मोहीम समाजाच्या आरोग्यासाठी कंटेंटचा योग्य वापर कसा करता येतो याचे उदाहरण आहे, असं रक्तिम दास म्हणाले.

तर, ऑल आऊटने नेहमीच कुटुंबांना डासांपासून आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या रोगांपासून वाचवण्याचे काम केले आहे. अजूनही भारतात व्हेक्टरजन्य रोगांबाबत जागरुकता कमी आहे. त्यामुळे आम्ही या मोहिमेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं ब्रिलिऑन कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे MD आणि CEO रतनजित दास यांनी स्पष्ट केलं.

डेंग्यू सारखे रोग वैयक्तिकरित्या थांबवता येत नाहीत, यासाठी सर्व घटकांची एकत्रित जबाबदारी आवश्यक आहे. या उपक्रमात आम्ही सहभागी असल्याचा अभिमान वाटतो, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांनी सांगितलं.

मोहिमेतील मुख्य वैशिष्ट्ये :

पॅन इंडिया टेलिव्हिजन कव्हरेज :

TV9 भारतवर्ष (हिंदी), TV9 कन्नड, TV9 तेलुगू, TV9 मराठी, TV9 बांग्ला, आणि TV9 गुजराती अशा सहा प्रादेशिक चॅनेल्सवर ही मोहीम प्रसारित होत आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागांपर्यंत डेंग्यू विषयक माहिती पोहोचेल.

अँकर-नेतृत्वातील, सह-ब्रँडेड व्हिडिओज :

TV9 च्या विश्वासार्ह अँकर्सद्वारे सादर केलेले ऑल आऊट सह-ब्रँडेड लघु व्हिडिओज तयार करण्यात आले आहेत. हे व्हिडिओज डेंग्यूची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत माहिती देतात.

“डॉक्टर बाईट्स” – वैद्यकीय मार्गदर्शन आणि समज-गैरसमज दूर करणे :

IMA चे सदस्य असलेले डॉक्टर या मालिकेत सहभागी होऊन डेंग्यूबाबत मिथकं दूर करतात आणि घरी करता येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देतात.

राष्ट्रीय चर्चासत्र – TV9 भारतवर्ष :

IMA चे वरिष्ठ प्रतिनिधी, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि प्रसिद्ध डॉक्टर या चर्चासत्रात सहभागी होऊन डेंग्यूचे सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम आणि एकत्रित प्रयत्नांची गरज यावर चर्चा करतात.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर विस्तृत प्रसार :

ही मोहीम TV9 नेटवर्कच्या वेबसाइट्स, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, X (ट्विटर), आणि लिंक्डइनवर देखील राबवली जात आहे. व्हिज्युअल्स, रील्स आणि माहितीपूर्ण लेखांमधून तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.

“साथ लढूया डेंग्यूशी” या मोहिमेद्वारे, ऑल आऊट, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि TV9 नेटवर्क सर्व भारतीयांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत – कारण प्रतिबंधाची सुरुवात जागरुकतेपासून होते आणि संरक्षणाची सुरुवात घरापासून.