Health : झोपेतून उठल्यावर डोकं दुखत किंवा जड झालेलं असेल तर होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान
तुम्हालाही सकाळी डोकेदुखीचा सामना करावा लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तर आता आपण या डोकेदुखीची नेमकी कारणं काय आहेत आणि डोकोदुखी झाल्यानंतर काय केलं पाहिजे याबाबत जाणून घेणार आहोत.

मुंबई : आपली जर रात्री झोप चांगली झाली तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. त्यात डॉक्टर प्रत्येकाला 7 ते 8 तास झोप घेण्याचा सल्ला नेहमी देतात. कारण आपली झोप नीट झाली नाही तर आपल्याला अनेत शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. पण बहुतेक लोकांना पुरेशी झोप घेऊन देखील सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणे, डोकं जड होणे, गरगरणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात काही लोकांचं सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखायला लागतं. त्यामुळे त्यांची चिडचिड होते, कामात नीट लक्ष लागत नाही. तसंच या डोकोदुखीकडे लोकं दुर्लक्ष करतात.
ताण-तणाव – सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक ताण-तणावात असतात. कामाचं टेन्शन, घरचे प्रोब्लेम्स अशा अनेक कारणांमुळे लोक चिंतेत असतात. यामुळे अशा लोकांना नीट झोप लागत नाही आणि त्यामुळे त्यांना सकाळी डोकेदुखीचा सामना करावा लागतो. तसंच झोपेचे विकार, डिप्रेशन, ताण-तणाव, नैराश्य, जास्त विचार करणे अशा अनेक कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
झोपेचे विकार – बहुतेक लोकांना झोपेच विकार असतात. झोपेशी संबंधित असलेल्या समस्यांमुळे लोकांना डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. आपल्या झोपेवर मेंदूचा भाग नियंत्रण ठेवत असतो, तसंच तो आपल्या वेदनांवरही नियंत्रण ठवतो. त्यामुळे जर तो भाग विस्कळीत राहिला तर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
शिफ्टमध्ये काम – बहुतेक लोकांच्या कामाच्या शिफ्ट सारख्या बदलत असतात. तर या बदलत्या शिफ्टमुळे लोकांची नीट झोप होत नाही. त्यामुळे त्यांना डोकेदुखीचा सामना करावा लागतो. शिफ्टमध्ये जे लोक काम करतात त्यांच्या शरीरातील नैसर्गिक ‘बॉडी क्लॉक’ थांबते त्यामुळे त्यांची झोपण्याची वेळ बदलत राहते. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.
डोकेदुखी झाल्यानंतर काय केलं पाहिजे?
डोकेदुखीची हा त्रास तुम्हालाही सतावत असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घेणं गरजेचं आहे. तसंच जर तुम्हाला डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका हवी असेल तर फ्री रहायला शिका. कसलाही विचार न करत शांत आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमची डोकेदुखीची समस्या कमी होईल. तसंच तुम्हाला झोपेचे विकार असतील तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.