उन्हाळ्यात दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या

कलिंगड हे हंगामी फळ फक्त आपल्याला उन्हाळ्यातच खायला मिळते, त्यामुळे या दिवसांमध्ये कलिंगड हे फळ भरपुर प्रमाणात खाल्ले जाते. तसेच कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्याच्या सेवनाने आपले शरीर हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर हे फळ केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर त्यामधील बिया देखील खूप आरोग्यदायी आहेत.

उन्हाळ्यात दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या
Watermelon seeds
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 11:20 AM

उन्हाळ्यात रसदार कलिंगड खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. कारण कलिंगडामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. तसेच कलिंगड खाल्ल्याबरोबर तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते. पण तुम्हाला महित आहे का की , आपण कलिंगड खाताना त्यातील बिया काढून खातो. त्याचसोबत कलिंगडाच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना अजूनही माहिती नाही. आज आपण या लेखाद्वारे कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे जाणून घेऊयात…

कलिंगडामध्ये 92 टक्के पाणी असते, त्याशिवाय त्यात जीवनसत्त्वे आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. अशातच आपण कलिंगडाच्या बियांबद्दल बोलायचे झाले तर या बिया झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारख्या अनेक सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतात. तसेच कलिंगडामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील कमी असते जे मधुमेह आणि हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे

पचनसंस्था चांगली राहते

कलिंगडामध्ये पोटॅशियम तसेच उच्च फायबर असते, जे खाल्ल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देते.

चमकणारी त्वचा

ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे किंवा कोलेजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहेत त्यांनी कलिंगड नक्कीच खावा कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि कोलेजन असते जे त्वचेची चमक वाढवते.

वजन कमी करा

कलिंगड हे असे एक फळ आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. पहिले म्हणजे, त्यात कॅलरीज कमी असतात आणि त्याव्यतिरिक्त, त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते फायबर, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी हे फळ त्यांच्या आहाराचा भाग बनवू शकता.

मजबूत प्रतिकारशक्ती

एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती किती मजबूत आहे हे पूर्णपणे शरीरात झिंकच्या प्रमाणात अवलंबून असते. यासाठी कलिंगडाच्या बिया झिंकचा चांगला स्रोत आहेत. झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तसेच त्यांना सक्रिय ठेवण्याचे काम करते जेणेकरून तुम्ही रोग आणि संसर्गापासून सुरक्षित राहाल.

हेल्दी फॅट

मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड हे हेल्दी फॅट्स आहेत. जे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक रोखण्यासाठी महत्वाची भुमिका बजावते. तुमच्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक असलेले हेल्दी लिपिड्स कलिंगडाच्या बियांमध्ये आढळतात.

मज्जासंस्था

कलिंगडाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी असते जे आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर एखाद्या व्यक्तीला डिमेंशिया किंवा कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्येचा त्रास होत असेल तर त्याने या बियांना आपल्या आहाराचा भाग बनवावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)