AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देण्यासाठी मुळीच वेळ नसतो.. असं सर्वांची तक्रार असते. अशात अनेकांचं वडील वजन वाढतं. काही जण असे देखील असतात, ज्यांचं वजन कमी खाऊन देखील वाढतं... तर जाणून त्या कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार
| Updated on: Aug 23, 2026 | 3:41 PM
Share

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करतात, तर काही जण कित्येक तास जीममध्ये देखील घालवतात. पण तरी देखील वजन कमी होत नाही. अशात तुमच्या काही सवयी यासाठी जबाबदार असू शकतात. जेव्हा लोकांना वजन वाढण्याची चिंता वाटते, तेव्हा ते सर्वात आधी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवतात. हे योग्यच आहे. पण त्यासबोतच काही सवयी देखील सुधाराव्या लागतील… तर कोणत्या आहेत त्या चुका जाणून घ्या. झोपेच्या वेळापत्रकापासून कॅलरीजकडे लक्ष देण्याची फार

जर तुमचे झोपेचं वेळापत्रक निश्चित नसेल किंवा तुम्ही दररोज एकाच वेळी झोपत नसाल, तर हे वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणा दिसून येतो. बहुतेक लोक आता रात्री उशिरा झोपतात. मग सकाळी उशिरा उठतात. यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास किंवा हार्मोन्सचे असंतुलन झाल्यास वजन वाढू शकते. विशेषतः महिलांमध्ये, पीसीओएस आणि हायपोथायरॉईडीझम सारख्या स्थितींमध्ये वजन वाढलेलं दिसून येतं. जर तुमचं वजन कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वाढत असेल, तर योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे. सतत वजन वाढणं योग्य नाही.

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल, तर त्यामुळेही वजन वाढू शकतं. योग्य सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून ते तुम्हाला आहार आणि व्यायामाबाबत योग्य मार्गदर्शन करू शकतील. यामुळे तुम्हाला तुमचं वजन सहजपणे नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

अतिरिक्त ताण कमी घ्या. जर तुम्ही सतत तणावाखाली असाल, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे. कारण ताणामुळे वजन वाढण्यासही कारणीभूत ठरू शकतं. तणावाच्या काळात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढू शकते. याशिवाय, लोक अनेकदा तणावाच्या काळात आपली शारीरिक हालचाल कमी करतात किंवा अति खाण्यास सुरुवात करतात.

कॅलरीजकडे लक्ष न देणे गरजेचं आहे. बाहेरचे अन्न टाळत आहोत असे वाटत असूनही आपले वजन का वाढते? वस्तुस्थिती अशी आहे की, घरी बनवलेलं जेवण करूनही आपण अनेकदा आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचं सेवन करतो. यामुळे चरबी वाढते. पण कोणतेही बदल करण्यापूर्वी एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद