AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिटॅमिन बी असलेले शाकाहारी पदार्थ!

व्हिटॅमिन बी मिळवण्यासाठी तुम्हाला मांस, मासे, अंडी आणि चिकन सारख्या गोष्टी खाव्या लागतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु सत्य हे आहे की शाकाहारी पदार्थ खाऊन देखील आपण हे पोषण मिळवू शकता. अशाच शाकाहारी पदार्थांवर एक नजर टाकूया.

व्हिटॅमिन बी असलेले शाकाहारी पदार्थ!
Vitamin B sourceImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 12, 2023 | 1:52 PM
Share

मुंबई: सर्व पोषक घटकांप्रमाणेच व्हिटॅमिन बी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, त्याशिवाय शरीराला अशक्तपणा, थकवा, आळस, अंगदुखी, हात-पाय सुन्न होणे, ऊर्जेची कमतरता यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन बी मिळवण्यासाठी तुम्हाला मांस, मासे, अंडी आणि चिकन सारख्या गोष्टी खाव्या लागतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु सत्य हे आहे की शाकाहारी पदार्थ खाऊन देखील आपण हे पोषण मिळवू शकता. अशाच शाकाहारी पदार्थांवर एक नजर टाकूया.

व्हिटॅमिन बी असलेले शाकाहारी पदार्थ

शेंगदाणे

प्रथिनांची गरज भागवण्यासाठी काळे चणे, हिरवे वाटाणे, चणे आणि राजमा यासारख्या गोष्टी खाल्ल्या जातात, परंतु तुम्हाला माहित आहे का की शेंगदाणे देखील व्हिटॅमिन बी चा चांगला स्रोत मानले जातात. त्यामुळे त्यांचे सेवन अवश्य करावे.

दूध

दूध हे एक संपूर्ण अन्न आहे कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक घटक असतात, व्हिटॅमिन बी चा ही चांगला स्रोत आहे, पनीर, चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर केल्यास आपल्याला देखील फायदा होईल. शाकाहारी लोकांना जरी दूध आवडत नसेल तरी त्यांच्यासाठी बरेच पर्याय आहेत.

सूर्यफुलाचे बी

आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, ते शिजवून खाल्ले जाऊ शकतात किंवा त्यातून निघणारे तेल स्वयंपाकाचे तेल म्हणूनही वापरले जाते. हे व्हिटॅमिन बी, नियासिन आणि फोलेटचा समृद्ध स्रोत आहे.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या नेहमीच आरोग्यासाठी उत्तम अन्न मानल्या जातात, लोहासोबतच व्हिटॅमिन बी देखील यात आढळते. पालकाच्या हिरव्या भाज्या रोजच्या आहारात खाऊ शकता. हिरव्या पालेभाज्यांचा रस सुद्धा तुम्ही पिऊ शकता. भाजी बनविण्याआधी हलक्या गरम पाण्याने भाजी धुवावीत, जेणेकरून जंतू नष्ट होतील.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच