विटामिन बी -12 च्या कमतरतेने काय होते?, तज्ज्ञांकडून जाणा कारण, उपचार
Vitamin B12 Deficiency: विटामिन बी-१२ ची आपल्या इतकी गरज असते तर याची कमतरता झाली तर शरीरात झिणझिण्या येणे, शरीर सुन्न पडणे, बधितरता जाणवणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Vitamin B12 Deficiency: आपल्या शरीराला आरोग्यदायी राखण्यासाठी अनेक प्रकारचे विटामिन्स आणि मिनरलची गरज असते. त्यापैकी एक विटामिन आहे बी-१२. यास कोबालामिन देखील म्हटले जाते. आपल्या शरीरासाठी हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. हे केवळ नर्व्ह सेल्स आणि ब्लड सेल्सला हेल्दी बनवण्यास मदत करत नाही तर शरीरातील पेशीचे डीएनए निर्मितीसाठी देखील गरजेचे असते. या संदर्भात तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय आपण पाहूयात…
विटामिन बी-12 कमतरतेची लक्षणे काय ?- (Symptoms of Vitamin B12)
डॉक्टराच्या मतानुसार विटामिन बी-१२ आपल्या नसांसाठी इतके गरजेचे असते की जर याची कमरतता आपल्या शरीरात झाली तर शरीरात झिणझिण्या येणे, शरीरातील अवयव सुन्न पडणे, स्पर्श ज्ञान देखील होत नाही. नसांची ताकद कमी होणे हे देखील लक्षण यात दिसते आणि तसेच विटामिन बी १२ रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी देखील महत्वाचे आहे. याची शरीरात कमतरता झाली तर एनिमिया सारखे आजार होऊ शकतात. एनिमिया या आजारात शरीरात रक्ताची निर्मिती कमी होते. आणि बाहेर शरीरात रक्त पुरवठा करावा लागत असतो.
विटामिन बी-12 च्या कमीची नेमकी कारणे काय – (Cause of Vitamin B12 deficiency)
पुरेसा आहार न घेणे, योग्य प्रकारचा सकस आहराचा आपण वापर करत नसलो तर शरीराचे पोषण नीट होत नाही. त्यामुळे आहार हा सकस आणि विविध्यपूर्ण असावा. पोटाच्या समस्या होत असले तर तुमच्या शरीरात बी-१२ ची कमतरता होते. त्यामुळे पोटाचे आजार असतील तरी या विटामिनची कमतरता जाणवते. आतड्यांची समस्या असेल तर हे विटामिन-बी-१२ ची उणीव होते.
काही उपाय आहेत ?
विटामिन बी – १२ असणारे पदार्थांचा समावेश आहारात केल्यास याची पूर्तता काही प्रमाणात करता येते. (Rich sources of Vitamin B12). विटामिन बी-१२ ची कमतरता कमी करण्यासाठी तुमच्या आहारात नॉनव्हेजचा वापर करता येईल. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दही, पनीर, धान्ये, फळांचा तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात समावेश करावा.त्यामुळे बी-१२ ची कमरता भरुन निघेत
