AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : वजन कमी असलं तरी होतो मधुमेह! Type 4 Diabetesची लक्षणं काय? कोणाला धोका जास्त? वाचा…

सर्व प्रकारच्या मधुमेहामुळे शरीरात इन्सुलिन प्रतिरोध (रेझिस्ट्न्स) निर्माण होतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. वेगवेगळ्या प्रकारच्या मधुमेहावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात.

Health : वजन कमी असलं तरी होतो मधुमेह! Type 4 Diabetesची लक्षणं काय? कोणाला धोका जास्त? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Sep 05, 2022 | 5:48 PM
Share

What is Type 4 Diabetes? : आजच्या काळात मधुमेह (Diabetes) ही आरोग्याची सर्वात मोठी (Health Problem) समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेक जणांचा या समस्येशी संघर्ष सुरू आहे. मधुमेहाचा शरीराच्या सर्व अवयवांवर वाईट परिणाम (Bad effect on Body) होतो. त्यामुळे हृदयविकार, मानसिक समस्या यांसह इतरही अनेक समस्या उद्भवतात. मधुमेह अनेक प्रकारचा असतो. बहुतांश लोक टाइप 2 आणि टाइप 1 मधुमेहाच्या जाळ्यात अडकतात. तर काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. टाइप 4 मधुमेह (Type 4 Diabetes) म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? हेल्थलाइनच्या अहवालानुसार, टाइप 4 मधुमेह हा वृद्ध लोकांमध्ये इन्सुलिनच्या प्रतिरोधामुळे (Resistance) होणारा आजार आहे. हा आजार वयस्कर व्यक्तींना होतो, ज्यांचे वजन जास्त नसते व ते बारीक असतात. या मधुमेहाबद्दल अधिक जाणून घेऊ या. ..

टाइप 4 मधुमेह म्हणजे काय?

लठ्ठपणा हे टाइप 2 मधुमेह होण्यामागचे कारण समजले जाते. मात्र टाइप 4 मधुमेहात तसे काही नसते. टाइप 4 मधुमेह नेमका का होतो, त्याचं नेमकं कारण काय, हे शोधण्याचा प्रयत्न सध्या शास्त्रज्ञ करत आहेत. वाढत्या वयामुळेही हा आजार होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. रोगप्रतिकारकशक्तीच्या पेशींच्या अधिक प्रमाणातील निर्मिती झाल्यासही टाइप 4 मधुमेह होऊ शकतो, अशी माहिती 2015 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आली होती. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला होता.

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे –

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे ही अन्य मधुमेहाच्या लक्षणांप्रमाणेच असतात. मात्र हा मधुमेह कमी वजनाच्या लोकांमध्ये होतो, त्यामुळे त्याचा अंदाज लावणे थोडे कठीण जाते. याची काही लक्षणे इतर आजारांच्या लक्षणांसारखीच असतात. त्यामुळे चाचण्या केल्यानंतरच या मधुमेहाबद्दल समजू शकते. प्रमुख लक्षणे जाणून घेऊ या…

  • खूप थकायला होणे
  • खूप भूक आणि तहान लागणे
  • अस्पष्ट दिसू लागणे
  • जखमा भरून न येणे
  • सतत लघवी लागणे
  • अचानक वजन कमी होणे

काय आहेत टाइप 4 मधुमेहावरील उपचार?

आत्तापर्यंत, टाइप 4 मधुमेहावर कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. एखादे अँटीबॉडी औषध विकसित करण्यास सक्षम ठरतील, अशी आशा संशोधकांना आहे. हे औषध शरीरातील रेग्युलेटरी टी-सेल्स (पेशी) कमी करण्यासाठी आणि टाइप 4 मधुमेहावर उपचार करण्यासाठी मदत करू शकेल.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक