
मधुमेह (Diabetes) हा झपाट्याने वाढत जाणारा आजार झाला आहे. तो प्रत्येक वयातील लोकांना लक्ष्य करत आहे. अनियमित दिनचर्या, असंतुलित आहार आणि तणावपूर्ण जीवन यामुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. पण मधुमेहींनी संतुलित आहार, व्यायाम आणि नियमीत औषधं घेतली तर मधुमेह नियंत्रित केल्या जाऊ शकतो. आहारा तज्ज्ञांच्या मते, डायबिटीज म्हणजे केवळ रक्तातील शर्करा, साखर वाढणे नाही. तर त्याचा शरीराच्या विविध भागावर परिमाम होऊ शकतो. त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी काय खावे नी काय नाही याचा डाएट प्लॅन कसोशीने पाळणे आवश्यक आहे.
मधुमेहींसाठी सकस आहार
फळे आणि भाज्या
मधुमेह रुग्णांसाठी हिरव्या पालेभाज्या वरदान आहेत. ब्रोकली, गाजर, टोमॅटो आणि कमी ग्लायसेमिक फळे ज्यामध्ये सफरचंद, पेरू आणि जांभूळ खाणे फायदेशीर ठरते. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ते रक्तातील साखरेचे प्रमाम हळूहळू वाढवतात.
ओट्स
ओट्स हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला अन्नपदार्थ म्हणून ओळखल्या जाते. ते पचायला हलके असते आणि रक्तातील शर्करा स्थिर ठेवण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाणे चांगले मानण्यात येते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि पनीर हे मधुमेह रुग्णांसाठी योग्य मानल्या जाते. हे पदार्थ शरीराला आवश्यक कॅल्शियम आणि प्रथिने देतात.
अक्रोड
अक्रोडमध्ये फॅट्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, जे हृदय निरोगी ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रीत ठेवण्यास मदत करते.
शेंगदाणे
शेंगदाणे हे प्रथिनांचा उमदा स्रोत मानण्यात येतो. शेंगदाणे रक्तातील साखर झपाट्याने वाढवत नाहीत. यामुळे ते मर्यादित प्रमाणात स्नॅक्स म्हणून खाणे चांगला पर्याय ठरू शकतो.
पण हे पदार्थ विषासमान, राहा दूर
कोल्ड ड्रिंक्स
कोल्ड ड्रिंक्समध्ये खूप साखर आणि प्रिझर्वेटिव्ह्स असतात, जे रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ करतात. त्यामुळे अशा पेयांपासून चारहात दूर राहा.
गोड आणि आंबट फळे
केळी, द्राक्षे, आंबा यांसारख्या गोड फळांमध्ये आणि संत्री, अननस यांसारख्या आंबट फळांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. ही फळ मधुमेहींनी खाणे टाळावे, त्यामुळे रक्तातील शर्करा वाढू शकते.
जंक फूड
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारख्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. हे पदार्थ विषासमान आहेत.
बेकरीचे पदार्थ
कुकीज, केक, पेस्ट्री यामध्ये साखर आणि मैदा भरपूर असतो. हे पदार्थ केवळ रक्तातील साखर वाढवत नाहीत तर वजनही वाढवतात.
दारू
दारू यकृतावर परिणाम करते आणि इन्सुलिनच्या कार्यात अडथळा निर्माण करू शकते. त्याचा अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते. दारू पिणे हा मधुमेहींसाठी घातक आहे.