Shilajit : पुरूष सोडा, स्त्रीयांनी शिलाजीत घेतल्यास काय परिणाम होणार? 14 दिवसात असं काही घडणार की…हा Video पाहाच

Shilajit Effect : शिलाजीत, अश्वगंधा, सफेद मुसळीचं नाव घेतलं की अगोदर पुरुषांच्या शक्तीवर्धक औषधी असा आपसूकच विचार येतो. ही औषधं पुरुषांसाठीच असल्याचा एक समज आहे. पण स्त्रीने जर शिलाजीत घेतलं तर काय परिणाम होतो?

Shilajit : पुरूष सोडा, स्त्रीयांनी शिलाजीत घेतल्यास काय परिणाम होणार? 14 दिवसात असं काही घडणार की...हा Video पाहाच
शिलाजीतचा वापर
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 25, 2025 | 1:35 PM

पुरुषांच्या शक्तीवर्धक औषधांचा बाजार कोट्यवधींचा नाही तर अब्जावधींचा आहे. शिलाजीत, अश्वगंधा, सफेद मुसळी, गोखरू आणि अजून इतर अनेक शक्तीवर्धक औषधांचे सेवन पुरूष करतात. शिलाजीत हे पुरूषांची दुर्बलता घालवण्याचे एक गुणकारी औषध मानण्यात येते. शिलाजीत हे पुरुषत्वासाठीचे रामबाण औषध मानण्यात येते. पण हेच शिलाजीत स्त्रीने घेतले तर? त्याचा काय परिणाम होईल?

स्त्रीसाठी शिलाजीत खरंच गुणकारी आहे का? अनेकांना वाटतं पुरूषांसाठी रामबाण असलेले हे औषध स्त्रीयांसाठी काय उपयोगी? उलट त्यांच्यात यामुळे हार्मोनल्स बदल होतील. पण एका तज्ज्ञाने याविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, सलग 14 दिवस जर स्त्रीने शिलाजीतचे सेवन केले तर तिच्या शरीरात अनेक बदल दिसतील.

औषध एक, फायदे अनेक

काही गैरसमजामुळे महिलांनी शिलाजीत सेवन करू नये असे सांगण्यात येते. बाजारात तर या औषधाची जाहिरात करण्यासाठी महिला कलाकारांचा वापर करण्यात येतो. पण शिलाजीत केवळ पुरूषच खाऊ शकतात, असं बिंबवले जाते. एका तज्ज्ञाने महिलांनी शिलाजीत सेवन केल्यास त्याचे फायदे सांगितले. त्यांच्या मते, स्त्रीने जर सलग 14 दिवस हे औषध घेतले तर तिचे पोट कमी होण्यास मदत होईल. तिची चरबी झपाट्याने कमी होईल. तिची चयपचय क्रिया सुधारले. रोजच्या कामातून येणार थकवा नाहीसा होईल. तिला प्रसन्न वाटायला लागेल. तिचा चिडचिड्या स्वभावाला शिलाजीतची मात्रा लागू पडेल.

इतर पण अनेक फायदे

शिलाजीत घेतल्याच्या 72 तासांच्या आत महिलेची रोग प्रतिकार शक्ती सुधारेल. त्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या नेहमीचे आजार दूर पळतील. सर्दी-पडसे, शिंकांची समस्या दूर होईल. शिलाजीतच्या सेवनामुळे ताण-तणावात मोठा दिलासा मिळतो. पचन संस्था सुधारते. अनेक आजारातून सुटका होईल. 14 व्या दिवशी महिलेची कांती तुकतुकीत होईल. तिच्या चेहऱ्यावर आपोआप चमक येईल. शिलाजीत पुरूषांसाठी जशी शक्तीवर्धक आहे, तशीच ती महिलांसाठी फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्त्रोताच्या आधारे देण्यात आली आहे. याविषयीचा कोणताही दावा टीव्ही ९ मराठी करत नाही. तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.