AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांसाठी आईचे दूध का महत्त्वाचे? जाणून घ्या ब्रेस्ट फिडींगचे फायदे

गेल्या काही दशकांत डबा बंद दूध पिण्याचा ट्रेंड वाढला आहे. स्तनपान केल्याने लहान आणि दीर्घकालीन आजारांपासून बाळाचे संरक्षण होऊ शकते. अनेक महिलांना दूध पाजताना त्रास होतो, हे टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येतो, पण मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

लहान मुलांसाठी आईचे दूध का महत्त्वाचे? जाणून घ्या ब्रेस्ट फिडींगचे फायदे
Breast feeding benefifts
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 28, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई: आईचे दूध नवजात बाळासाठी उत्तम असते हे आपल्या सर्वांना माहित आहे, त्यामुळे जन्मानंतर आईचे जाड पिवळे दूध लगेच पाजले जाते, जेणेकरून बाळाचे आरोग्य चांगले राहू शकेल. पण गेल्या काही दशकांत डबा बंद दूध पिण्याचा ट्रेंड वाढला आहे. स्तनपान केल्याने लहान आणि दीर्घकालीन आजारांपासून बाळाचे संरक्षण होऊ शकते. अनेक महिलांना दूध पाजताना त्रास होतो, हे टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येतो, पण मुलांना आईचे दूध मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. चला तर मग जाणून घेऊया स्तनपानाचे फायदे काय आहेत.

स्तनपानाचे फायदे

  1. लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो, त्यामुळे ताप आणि इतर आजार अटळ असतात. जन्मापासून आईचे दूध पिणाऱ्या नवजात बालकांची प्रतिकारशक्ती इतर मुलांपेक्षा चांगली असते. स्तनपानाने जी प्रतिकारशक्ती प्राप्त होते, ती डबाबंद दुधात मिळत नाही.
  2. आईच्या दुधात अँटिऑक्सिडंट, एंझाइम्स आणि अँटीबॉडीज आढळतात, ज्यामुळे मुलांना आजारांपासून संरक्षण तर मिळतेच, शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास त्यापासून सुटका मिळवणेही सोपे जाते.
  3. लहान मुले अनेकदा पोटाच्या विकारांना बळी पडतात. त्यांना अतिसार, बद्धकोष्ठता, उलट्या आणि गॅसशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. बाळाला असा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर त्यांना आईचे दूध पाजावे.
  4. अनेक मुले त्यांच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत जिवंत राहत नाहीत, हे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे की, ज्या बालकांना आईचे दूध पाजले जात नाही, अशा बालकांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण जास्त आढळते, कारण ते आजारांपासून कमी सुरक्षित असतात.
  5. मुलांमध्ये लठ्ठपणा देखील धोकादायक असतो, परंतु आईचे दूध नियमित प्यायल्याने बाळाचे वजन टिकून राहते, तसेच ते मुलांच्या ओरल हेल्थसाठी देखील फायदेशीर मानले जाते यामुळे कॅव्हिटी आणि इतर दंत समस्यांचा धोका कमी होतो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?