चांगली बॉडी आणि फिटनेस असूनही रेमो डिसूझांना हृदय विकाराचा झटका का आला? तज्ज्ञ म्हणतात…..

रेमो 46 वर्षांचे आहेत. त्यांना या वयात हृदय विकाराचा झटका येणं धक्कादायक आहे (Remo D'Souza suffer from a heart attack).

चांगली बॉडी आणि फिटनेस असूनही रेमो डिसूझांना हृदय विकाराचा झटका का आला? तज्ज्ञ म्हणतात.....

मुंबई : नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना शुक्रवारी (11 डिसेंबर) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रेमो यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. हार्ट ब्लॉकेज हटवल्यानंतर त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं. रेमो 46 वर्षांचे आहेत. त्यांना या वयात हृदय विकाराचा झटका येणं धक्कादायक आहे (Remo D’Souza suffer from a heart attack).

‘स्टार प्लस’ वाहिनीच्या ‘डान्स प्लस’ या रियालिटी शोचे जज रेमो डिसूझा एकदम फिट दिसतात. त्यांचा डान्स बघून त्यांच्यात भरपूर एनर्जी आहे, असं दिसतं. मात्र, एवढ्या फिट माणसाला हृदय विकाराचा झटका येणं ही आश्चर्याची बाब आहे. दरम्यान, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, माणसाला कोणत्याही कारणाने हृदय विकाराचा झटका येऊ शकतो (Remo D’Souza suffer from a heart attack).

हृदय विकाराचा झटका येण्यामागील काही कारणे:

धुम्रपान :

मायो क्लिनिकच्या एका रिपोर्टनुसार, धुम्रपान किंवा तंबाखूचं सेवन केल्याने माणसाला हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे धुम्रपान आणि सिगारेटपासून लांब राहण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात.

हाय ब्लड प्रेशर :

हाय ब्लड प्रेशर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्येही समस्या निर्माण करतो. तब्येत वाढणं, कॉलेस्ट्रोल आणि मधूमेह या कारणांमुळे देखील हाय ब्लड प्रेशर सारखी समस्या उद्भवते. त्यामुळे आपण सावधान राहिलं पाहिजे.

मधूमेह:

शरीरातील स्वादुपिंड योग्यप्रकारे काम न केल्याने रक्तात शुगरचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे हार्मोन्स बंद होतात. अशा परिस्थितीत ब्लड प्रेशरची समस्या उद्भवू शकते.

अनुवंशिक :

काही लोकांना अनुवंशिकपणे हृदय विकाराचा झटका येतो असं तज्ज्ञांचं मत आहे. ज्या लोकांच्या कुटुंबात भाऊ-बहिण किंवा ज्येष्ठ नागरिकांना हृदय विकाराचा झटका आला असेल त्यांनी काळजी घेणं जरुरीचं आहे. विशेष म्हणजे पुरुषांमध्ये 55 ते 65 या वयात याचा जास्त धोका असतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

तणाव :

जास्त मानसिक तणावामुळेदेखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यापासून बचाव व्हावा यासाठी तज्ज्ञ नियमित व्यायाम आणि योग्य आहार करण्याचा सल्ला देतात.

संबंधित बातमी : नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा धक्का, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI