महिन्याच्या ‘त्या’ दिवसांमध्ये वजन वाढल्यासारखे वाटते? समोर आले हे आश्चर्यकारक कारण

| Updated on: Jan 31, 2022 | 8:16 PM

मासिक पाळीचे ते दिवस अत्यंत वेदनादायक असतात; आणि म्हणूनच महिन्याचे हे दिवस पटकन निघून जावे, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मासिक पाळीतील पोटदुखी, अंगदुखी, चेहऱ्यावरील पुरळ हे सामान्य लक्षणे असली तरी अनेक स्त्रियांना या काळात वजनवाढीच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागत असते. या मागील कारणांचा कधी विचार केलाय का ?

महिन्याच्या ‘त्या’ दिवसांमध्ये वजन वाढल्यासारखे वाटते? समोर आले हे आश्चर्यकारक कारण
मासिक पाळीतील समस्या
Follow us on

वयात आल्यानंतर प्रत्येक महिलेला मासिक पाळीचा (Periods) सामना करावा लागत असतो. मासिक पाळीतील त्या असह्य वेदना (Periods Pain), अपराधीपणाची भावना, चिडचिडेपणा आदींचा सामना काही वेळा अगदी नकोसा असतो. परंतु हे सर्व नैसर्गिक असल्याने त्याला तोंड देण्याशिवाय पर्यायदेखील नसतो. मासिक पाळीत प्रत्येक महिलेस आपआपली लक्षणे असतात. ही ओळखीची लक्षणे अनेक वेळा मासिक पाळी येण्याच्या एक दिवस आधीपासूनच जाणवत असतात. त्यानुसार महिला आपले खानपानासह कामाचेही नियोजन करीत असतात. मासिक पाळीच्‍या पहिल्याच दिवशी शरीरात पाणी काही अंशी साठवायला लागत असते. त्‍यामुळे महिलांना काहीसा जडपणा आल्याची भावना निर्माण होत असते. अनेक वेळा तर एकाच दिवसात वजन वाढल्याच्या (Gaining weight) तक्रारी अनेक महिलांकडून करण्यात येतात. पोटाला सूज येत असल्याने पोटाचा घेरदेखील वाढलेला दिसून येत असतो. जाणून घेऊया वजन वाढण्याची नेमकी कारणे काय आहेत.

इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते

मासिक पाळीच्या दरम्यान, महिलांच्या शरीरातील ‘इस्ट्रोजेन’चे प्रमाण वाढते, त्यामुळे शरीरात पाणी साठवण्याची क्षमता वाढते. तसेच पोटाला सूज येत असल्याने पोटाचा घेर वाढल्यासारखे जाणवते. सोबतच प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स्‌ही लक्षणीय प्रमाणात वाढते, यामुळे शरीराचे वजन अचानक वाढू लागते.

हालचाल कमी होते

मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना असह्य वेदनांचा सामना करावा लागत असतो. वेदनांमुळे झोपून राहावेसे वाटते. त्यामुळे अनेक महिला कामांना लांब सारत आराम करण्याला प्राधान्य देत असतात. व्यायाम, शारीरिक हालचाली आदींच्या अभावामुळे साहजिकच वजनवाढीची समस्या निर्माण होत असते. मासिक पाळीतही आराम करून आपले दैनंदिन कामे तसेच व्यायाम सुरूच ठेवावा.

अतिरिक्त कॉफीचे सेवन

अतिरिक्त कॉफीच्या सेवनामुळे वजन वाढू शकते. कॉफीमध्ये कॅफिन असते. त्याचे जास्त प्रमाण झाल्यास यातून सूज तसेच वजन वाढीची समस्यादेखील वाढू शकते. मासिक पाळीदरम्यान महिला थकवा दूर करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी कॉफीचे सेवन करतात. त्यामुळे हे सर्व घटक वजन वाढीला कारणीभूत ठरतात.

प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ

मासिक पाळीच्या वेळी प्रामुख्याने पोटदुखीचा त्रास होत असतो. शिवाय या दिवसांमध्ये आपली पचनक्रियादेखील काही प्रमाणात बिघडलेली दिसत असते. मासिक पाळीत खाल्लेले अन्न पचत नसल्याच्याही अनेक तक्रारी महिलांकडून करण्यात येत असतात. प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्समध्ये होणारी वाढ हेदेखील यास कारण ठरते. यामध्ये काहीही खाल्ले तरी पोट फुगते आणि त्यामुळे महिलांना अॅसिडिटी, वजन वाढीच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. शरीरात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यामुळे भूकही वाढते. या दिवसात आपल्याला खूप खावेसे वाटत असते.

टीप : सदर मजकूर केवळ माहितीवर आधारीत असून याला सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या

मुलांना हेल्दी, गुबगुबीत आणि उंच बनवायचं असेल तर मुलांना ब्रोकोली राइस द्यायलाच हवा!

Corona Update | औरंगाबादसह नांदेड, लातूरातही कोरोनाची लाट ओसरण्याच्या वाटेवर, काय आहे मराठवाड्याची स्थिती?

‘वर्क फ्रॉम होम’मुळे शरीराला जडपणा आलाय… हे पदार्थ उपयुक्त ठरतील