हे वाचलंत का? म्हणे रोज आंघोळ केल्याने आरोग्याचे होते नुकसान !

वैयक्तिक स्वच्छतेसाठी बहुतांश लोक रोज आंघोळ करतात, काहीजण तर सका-संध्याकाळ अशी दोन वेळाही आंघोळ करतात. पण अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की रोज आंघोळ करणे योग्य नाही. जाणून घ्या आठवड्यातून किती दिवस आंघोळ करणे योग्य मानले जाते.

हे वाचलंत का? म्हणे रोज आंघोळ केल्याने आरोग्याचे होते नुकसान !
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 07, 2023 | 8:40 AM

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत बरेच जण आंघोळीला (bath) सुट्टी देतात. मित्र-मित्र भेटले की एकमेकांना पहिल्यांदा हेच विचारतात की, काय रे आज आंघोळ केलीस की नाही ? असे फार कमी लोक असतात जे या गारेगार वातावरणात रोज आंघोळ (taking bath daily) करण्याची हिंमत करतात. तर आपल्यापैकी काही जण एक दिवसाआड अंघोळ करणे पसंत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की अनेक संशोधनांतूनही अशी माहिती समोर आली की रोज आंघोळ करण्यापेक्षा आठवड्यातून काही दिवस आंघोळ करणे जास्त योग्य ठरते. तसेच रोज आंघोळ करणे हे आरोग्यासाठीही नुकसानकारक (side effects of taking bath daily) असते, असेही काही अभ्यासांत म्हटले आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे, पूर्ण माहिती जाणून घेऊया.

रोज अंघोळ केल्याने होणारे नुकसान

दररोज अंघोळ न करण्याची लोकांची अनेक कारणे असू शकतात. कोणी शरीरातून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी अंघोळ करतं तर कोणी धार्मिक रितीमुळे रोज आंघोळ करतात. तर काही लोकांना आंघोळ केल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही, तर काही लोक व्यायाम केल्यानंतर आंघोळ करतात. पण काही लोकं असेही असतात, ज्यांच्याकडे काहीही कारण नसतं तर लोकांच्या दबावामुळे किंवा घरातले लोक काय म्हणतील असा विचार करून त्यांना दररोज आंघोळ करावी लागते. पण दररोज आंघोळ करण्याचे काही दुष्परिणामही असू शकतात

– दररोज आंघोळ केल्याने त्वचा जास्त कोरडी आणि इरिटेटेड होऊ शकते. यासोबतच त्वचेवर खाज येण्याची समस्याही सुरू होते.

– स्किन बॅरिअरटचे नुकसान होते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते.

– दररोज आंघोळ केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. याच कारणास्तव, डॉक्टर कधीकधी मुलांना दररोज आंघोळ न करण्याचा सल्ला देतात.

– जे लोक दररोज अँटीबॅक्टेरियल साबणाने आंघोळ करतात त्यांना हे समजत नाही की हे साबण केवळ खराब बॅक्टेरियाच नाही तर त्वचेला फायदा करणारे चांगले बॅक्टेरिया देखील नष्ट करतात.

– दररोज आंघोळ केल्याने शरीराला कोणताही (आरोग्यविषयक) फायदा होत नाही, उलट पाणी, साबण, शाम्पू आणि इतर गोष्टींचे नुकसान होते, ते वेगळेच.

आठवड्यातून किती वेळा आंघोळ करणे पुरेसे ?

दररोज आंघोळ करण्याऐवजी आठवड्यातून 3 दिवस आंघोळ करणे देखील तितकेच फायदेशीर आहे. यामुळे जर हिवाळ्यात रोज आंघोळ करावीशी वाटत नसेल तर एक दिवसाआड मोकळेपणाने आंघोळ करा.